Maharashtra : मंत्रिमंडळाच्या नव्या फेरबदलात तावडेंची “शाळा” सुटली, पाटी फुटली !! कुणाला काय मिळाले ?

गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा असलेल्या मंत्रीमंडळ विस्ताराला अखेर मुहूर्त लागला आणि आज रविवारी १३ नवीन मंत्र्यांनी राजभवनात राज्यपालांकडून पदाची शपथ घेतली. यामध्ये भाजपमधली काही विद्यमान मंत्र्यांना डच्चू दिल्यामुळे त्यांच्यामध्ये नाराजी असल्याची माहिती सूत्रांनी दिली होती. नव्या खातेवाटपामध्ये सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे शिक्षण विभागात सुरू असलेल्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर विनोद तावडेंकडची सर्व खाती काढून घेऊन ती आशिष शेलार यांना देण्यात आली आहेत. तर विनोद तावडेंकडे आता फक्त संसदीय कामकाज खातं उरलं आहे. त्यामुळे मंत्रिमंडळाच्या नव्या फेरबदलात तावडेंची “शाळा” सुटली, पाटी फुटली असेच म्हणावे लागत आहे. याशिवाय, गैरव्यवहारामुळे वादात आलेल्या प्रकाश मेहतांना डच्चू देऊन त्यांचं खातं नव्यानेच भाजपमध्ये दाखल झालेल्या राधाकृष्ण विखे पाटील यांना देण्यात आलं आहे.
कॅबिनेट मंत्री
राधाकृष्ण विखे पाटील – गृहनिर्माण
जयदत्त क्षीरसागर – रोजगार हमी आणि फलोत्पादन
आशिष शेलार – शालेय शिक्षण, क्रीडा आणि युवक कल्याण
संजय कुटे – कामगार, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण
सुरेश खाडे – सामाजिक न्याय
अनिल बोंडे – कृषी
अशोक उईके – आदिवासी विकास
तानाजी सावंत – जलसंधारण
राम शिंदे – पणन आणि वस्त्रोद्योग
संभाजी पाटील निलंगेकर – अन्न व नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण, काशल्य विकास, माजी सैनिक कल्याण
जयकुमार रावल – अन्न व औषध प्रशासन, पर्यटन, राजशिष्टाचार
सुभाष देशमुख – सहकार, मदत व पुनर्वसन