अल्पवयीन मुलावर अत्याचार करणाऱ्या आरोपीची न्यायालयात सहाव्या मजल्यावरून आत्महत्या

दिंडोशी सत्र न्यायालयाच्या परिसरात आज खळबळजनक घटना घडली आहे. रिमांडसाठी न्यायालयात हजर करण्यासाठी आणलेल्या आरोपीने सहाव्या मजल्यावरून उडी मारली आणि जागीच आरोपीचा झाला मृत्यू झाला आहे. याप्रकरणी कुरार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेचा पंचनामा केला असून मृतदेह गोरेगाव येथील सिद्धार्थ रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. मृत आरोपीचे नाव विकास पवार असं आहे.
पवई येथील एका ५ वर्षाच्या मुलावर अत्याचार प्रकरणी पोस्कोच्या गुन्ह्यात २०१५ मध्ये अटक करण्यात आलेला आरोपी विकास पवार याला आर्थर रोड तुरुंगातून आज सुनावणीसाठी दिंडोशी सत्र न्यायालयात आणण्यात आले होते. त्याने सोबत असलेल्या पवई पोलीस गार्डच्या हाताला झटका देऊन सहाव्या मजल्यावरूम उडी घेऊन आत्महत्या केली. विकास पवार हा घाटकोपर येथे राहणारा होता असल्याची माहिती पोलिसांनी दिली.