नीरेचे पाणी पेटले : उदयनराजे आणि रामराजे यांच्यात शाब्दिक चकमक

नीरेचे पाणी चांगलेच पेटले आहे . याच पाण्यावरून रामराजे निंबाळकर आणि उदयनराजे भोसले या चांगलीच शाब्दिक चकमक उडाली आहे . रामराजे यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना , रामराजे वयाने मोठे आहेत म्हणून मी शांत आहे माझ्या वयाचे असते तर जे काही बोलले त्याबद्दल जीभ हासडली असती असे प्रत्युत्तर उदयनराजे भोसले यांनी रामराजे यांना दिले आहे. बारामतीकडे वळवलेल्या नीरा देवघरच्या पाण्यावरून दोन राजघरण्यांमध्ये संघर्ष सुरू झालेला दिसतो आहे. पिसाळलेली कुत्री जोपर्यंत असतील तोपर्यंत मी पिसाळलेलाच राहणार अशी टीका राष्ट्रवादीचे नेते रामराजे निंबाळकर यांनी केली होती. ज्याला उदयनराजे भोसले यांनी उत्तर देत रामराजे माझ्या वयाचे असते तर जीभ हासडून हातात दिली असती असं उदयनराजेंनी म्हटलं आहे. या दोघांमध्ये मध्यस्थी करण्याचा प्रयत्न शरद पवार यांनी केला खरा मात्र तो अपयशी ठरला कारण त्या बैठकीतून उदयनराजे भोसले बाहेर पडले आणि त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी तीव्र शब्दात त्यांचा संताप व्यक्त केला.
माझी तुलना पिसाळलेल्या कुत्र्याशी रामराजेंनी केली. त्यांच्यासारख्या मोठ्या माणसाला हे बोलणं शोभतं का? मी पिसाळतो असं ते म्हणतात. होय ते लोकांची कामं झाली नाहीत तर मला राग येतोच. मी कधीही कोणाचं वाईट चिंतलेलं नाही. तरीही ते म्हणतात मी चक्रम आहे. लोकांवर अन्याय होत असेल तर मी चक्रम होतोच. रामराजेंनी एक लक्षात ठेवावं मी काही बांगड्या भरलेल्या नाहीत उचलली जीभ आणि लावली टाळ्याला असं कुणीही करू नये. कुपोषित मुलासारखं वागू नये वेळ पडली तर जशास तसं उत्तर आम्हालाही देता येतं. पण आमच्यावर तसे संस्कार नाहीत. मी काय बोललो ते एकदा सगळ्यांना विचारा. रामराजे जर माझ्या वयाचे असते तर जीभ हासडून हातात दिली असती.