SBI : स्टेट बँकेत झिरो बॅलेन्स खाते असेल तर आता काळजीचे कारण नाही ….

आपण जर एसबीआय ग्राहक असाल आणि तुमचे बेसिक सेव्हिंग बँक अकाऊंट (बीएसबीडी) अकाउंट असेल तर अशा ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. भारतीय रिझर्व्ह बँके(RBI)नं खातेधारकांना काही नियमांमधून सूट दिली आहे. त्यामुळे आता खातेधारकांना चेकबुक आणि इतर सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. विशेष म्हणजे अशी सुविधा पुरविताना बँक कोणतीही अट ठेवू शकत नाही. म्हणजेच झिरो बॅलन्सवाल्या खातेधारकांनाही बँकेला या सुविधा उपलब्ध करून द्यावा लागणार आहेत. बीएसबीडी खात्यांच्या नियमांतर्गत आता खातेधारकांना खात्यात किमान रक्कम ठेवणं आवश्यक नाही. तसेच त्यांना एटीएममधून चार वेळा पैसे काढण्याची मुभाही देण्यात आली आहे.
बेसिक सेव्हिंग बँक अकाऊंट (बीएसबीडी) हे झिरो बॅलन्समध्ये उघडता येते. तसेच या खात्यात अमुक एवढी रक्कम ठेवावी, असं कोणतंही बंधन नसतं. प्राथमिक बचत खात्याच्या स्वरूपात बीएसबीडी हे खातं उघडलं जातं. यात झिरो बॅलन्सपासून खातं उघडता येते. तत्पूर्वी नियमित व्यवहार सुरळीत असलेल्या बचत खात्यांनाच अशी सुविधा मिळत होती, परंतु आता झिरो बॅलन्सवाल्या खात्यांनाही अशी सुविधा प्राप्त होणार आहे.
आरबीयआनं बँकांना बचत खात्याच्या स्वरूपात बीएसबीडी खातं उघडण्याची सुविधा दिली आहे. यात कोणत्याही शुल्काशिवाय सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. रिझर्व्ह बँकेच्या आदेशानुसार, बँकेत किमान रक्कम नसली तरी त्या ग्राहकाला चेकबुक जारी करावं लागणार आहे. तसेच अतिरिक्त मूल्यवर्धित सेवांचाही त्यांना लाभ मिळवून द्यावा लागणार आहे. बँका ग्राहकांना अतिरिक्त सुविधा पुरवण्यासाठी खात्यात किमान रक्कम असण्याची अट घालू शकत नाहीत. बीएसबीडी खात्यात किमान रक्कम ठेवणं गरजेचं नाही.