News Updates : गल्ली ते दिल्ली , दुपारच्या महत्वाच्या बातम्या … एक नजर

1. औरंगाबादः सरकारी जमीन हडपल्याप्रकरणी धनंजय मुडेंविरोधात गुन्हा दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश.
2. दिल्लीः माजी केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री प्रफुल्ल पटेल चौकशीसाठी आज पुन्हा ईडी कार्यालयात दाखल.
3. उद्या केंद्रीय मंत्रिमंडळ आणि केंद्रीय संसदीय मंडळाची बैठक होणार आहे
4. भाजपचे खासदार डॉ. वीरेंद्र कुमार १७ व्या लोकसभेचे प्रोटेम स्पीकर
5. दिल्लीः पत्रकार प्रशांत कनौजियाच्या अटकेवरून सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारला खडसावले., पत्रकार प्रशांत कनौजियाची तात्काळ सुटका करण्याचे आदेश.
6. अहमदनगर: जामखेड शहरातील जिल्हा परिषद मराठी मुलींची शाळा येथे वादळाने सहा वर्ग खोल्यांचे पत्रे उडून गेल्याने शाळेचे मोठे नुकसान
7. पुणेः वस्तू आणि सेवा करापोटी (जीएसटी) जूनचे १४१ कोटी रुपयांचे अनुदान पालिकेच्या तिजोरीत जमा
8. अकोला : राष्ट्रीय महामार्गावरील डोंगरगाव फाट्यावर भरधाव टँकरच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार
9. काश्मीरमधील चकमकीत २ दहशतवादी ठार; इंटरनेट बंद
10. दिल्लीत पावसाची संततधार, उकाड्यापासून जनतेला दिलासा
11. जालनाः पाण्यासाठी गेलेल्या मुलीचा पाय घसरला. विहिरीत पडून गंभीर जखमी. उपचारासाठी औरंगाबादला हलवले.
12. औरंगाबादः नारसापूर-नागरसोल एक्स्प्रेसमधून पडून दोन जण जखमी. जखमींवर उपचार सुरू. सकाळची दुर्दैवी घटना.
13. मेरठ: अल्पवयीन मुलीवर बलात्कारप्रकरणी मदरशातील शिक्षकाला अटक
14. जामीन अर्ज फेटाळताच; आमदाराने बलात्काराची तक्रार करणाऱ्या महिलेशी केले लग्न
15. पाटणाः किडवाईपुरी भागात एकाच कुटुंबातील तिघांची हत्या, पोलिसांचा तपास सुरू
16. औरंगाबाद जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस, तिघांचा मृत्यू