नगर -पुणे रस्त्यावर ट्रक-स्कॉर्पिओचा अपघात, धुळ्यातील ३ जण ठार

नगर-पुणे महामार्गावर जातेगाव फाट्याजवळ उभ्या असलेल्या ट्रकवर स्कार्पिओ गाडी आदळून झालेल्या भीषण अपघातात तिघांचा मृत्यू झाला आहे. तर, एकजण गंभीर जखमी आहे. आज पहाटे हा अपघात झाला. सर्वजण धुळ्यातील रहिवासी आहेत.
ओझायर तसनीय अख्तर अन्सारी (वय-३० रा. फिरदोस नगर, धुळे) फैसल गुलाब रब्बाली अन्सारी (वय-२० रा. मछली बाजार, धुळे) इरफान शयशोदोहा अन्सारी (वय-२० रा. मछली बाजार, धुळे) अशी ठार झालेल्यांची नावे आहेत. तर अदनान निहाल अन्सारी (वय-२१ रा. तिरंगा चौक, धुळे) हा जखमी आहे.
पुण्याकडून नगरकडे जाणाऱ्या रोडवर जातेगाव फाट्याजवळ उभ्या असणाऱ्या ट्रकवर पाठीमागून आलेल्या स्कार्पिओ जीपने जोराची धडक दिली. पहाटेच्या झोपेत चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटून हा अपघात झाला असण्याची शक्यता सुपा पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र भोसले यांनी दिली.