News Updates : गल्ली ते दिल्ली , एक नजर , महत्वाच्या बातम्या …

1. मुंबईः जोगेश्वरी पश्चिमेकडे असलेल्या अकबर अली कम्पाऊंडमधील दुकानाला भीषण आग
2. ठाणे : मुलगी दहावी पास झाल्याच्या आनंदात आणलेल्या पेढ्यांमधून सात जणांना विषबाधा, सर्वांवर रुग्णालयात उपचार सुरु दाखल, प्रकृती स्थीर, संभाजीनगर येथील घटना.
3. पुण्यातील हडपसर भागातील एका व्यक्तीने सोशल मीडियावर आत्महत्या करण्याची टाकली पोस्ट; शोध घेऊन केले मत परिवर्तन, सायबर विभागाची कामगिरी
4. कोल्हापूर : आंबील कट्टी (ता. कागल) येथे सूरज नंदुकमार घाटगे (वय २८) या तरुणाचा तिघा अज्ञातांकडून चाकूने भोसकून खून
5. कोल्हापूर : शाहुवाडी तालुक्यातील एका गावातील १४ वर्षाची अल्पवयीन मुलगी कुमारी माता बनली; सख्ख्या भावाकडूनचं हे माणुसकीला काळीमा फासणारे कृत्य
6. पुणेः अमेझॉन कंपनीला लाखो रूपयांचा गंडा घालणाऱ्या एका कर्मचाऱ्यासह त्याच्या इंजिनिअर मित्राला सायबर सेलच्या पोलिसांकडून अटक
7. दिल्ली पोलिसांच्या सायबर क्राइम पथकाकडून तीन नायजेरियन नागरिकांना अटक; रोजगार देण्याच्या बहाण्याने अनेकांना लाखोंचा गंडा घातल्याची माहिती
8. पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून मालदीवच्या राष्ट्राध्यक्षांना टीम इंडियाची क्रिकेट बॅट भेट
9. परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर भूतानमध्ये दाखल; जयशंकर यांचा पहिलाच परदेश दौरा
10. युक्रांदचे माजी उपाध्यक्ष व सुप्रसिद्ध लेखक फिरोज अशरफ यांचे मुंबई येथे अपघाती निधन
11. आसामः माजी लष्करी अधिकारी मोहम्मद सनाउल्ला यांची मुक्तता; २० हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर न्यायालयाकडून जामीन मंजूर
12. औरंगाबाद : दहावीत नापास झाल्यामुळे न्यू हनुमाननगर येथील अनिकेत संजय शेळके या विद्यार्थ्यांने आत्महत्या केली .
13. अकोला : दहावीत नापास झाल्यामुळे विद्यार्थीनीची गळफास लावून आत्महत्या.
14. नाशिक : वादळी वाऱ्यासह झालेल्या जोरदार पावसाने वडाळागाव परिसरातील महेबूबनगरमध्ये घराची भिंत कोसळून एका महिलेचा मृत्यू.
15. चंद्रपूर : दोन दुचाकी वाहनांची धडक; तिघांचा मृत्यू तर एक जण गंभीर, वरोरा येथील घटना.
16. सोलापूर : घरगुती भांडणातून भावाने केला भावाचा खून, माळशिरस येथील घटना
17. नवी दिल्ली – पश्चिम बंगालमधील दार्जिलिंग नगरपालिकेतील गोरखा जनमुक्ती मोर्चाच्या 17 नगरसेवकांचा भाजपामध्ये प्रवेश
18. नाशिक : प्रथम निर्भया शौर्य पुरस्काराने बँक कर्मचारी सविता मुर्तडक पोलीस आयुक्तल्याकडून सन्मानित
19. मुंबई: अंधेरी पश्चिमच्या रॉयल क्लासिक इमारतीच्या मजल्यावरून पडून एका मजुराचा मृत्यू
20. रायगड – दक्षिण आफ्रिकन महिलेची छेड काढल्याप्रकरणी श्रीवर्धन पोलिसांनी केली दोन जणांना अटक, अटक केलेल्यांपैकी एक अल्पवयीन
21. रत्नागिरी – दापोली तालुक्यातील पन्हाळेकाझी बोरवाडीतील घराला आग लागून शशिकांत दत्ताराम पेडणेकर यांचा जळून मृत्यू
22. अहमदनगरः अकोले तालुक्यातील भंडारदरा परिसरात स्विफ्ट गाडीचा अपघात, संकेत यशवंत जाधव (रा.चिचोंली गुरव ,ता.संगमनेर) यांचा मृत्यू, दोन जण गंभीर जखमी