ICC World Cup 2019 Live : भारत वि. ऑस्ट्रेलिया , शिखर धवनचे दमदार शतक.. !!

भारत : 352/5 ( 50.00 ov)
बॅटिंग : रोहित शर्मा ( Out ) / शिखर धवन (117) (Out) / विराट कोहली (82)(Out) / हार्दिक पांड्यया (48) (Out)/ महेंद्र सिंह धोनी (27)(Out)/लोकेश राहुल (11)(नाबाद ) / केदार जाधव (००) (नाबाद )
बाकी फलंदाज – विराट कोहली, लोकेश राहुल, महेंद्र सिंह धोनी, हार्दिक पांड्या, केदार जाधव, भुवनेश्वर कुमार, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह
आयसीसी वर्ल्डकप २०१९ मधील भारताचा दुसरा सामना बलाढ्य ऑस्ट्रेलियासोबत होत असून स्पर्धेतील पहिलाच सामना जिंकलेल्या आणि एकूण २ वर्ल्डकप आपल्या नावावर करणारा टीम इंडिया ५ वेळा वर्ल्डकप जिंकणाऱ्या ऑस्ट्रेलियाशी आज दोन हात करत आहे. ऑस्ट्रेलियाने अफगाणिस्तान आणि वेस्ट इंडीजचा पराभव करत स्पर्धेत आपल्या नावे दोन विजय नोंदवले आहेत. लंडनमधील आयसीसी वर्ल्डकप २०१९ मधील भारताचा आज दुसरा सामना. लंडनमधील केनिंग्टन ओव्हल स्टेडियमवर होतोय भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामना. भारतीय वेळेनुसार दुपारी ३ वाजता होतेय सामन्याला सुरुवात झाली आहे .
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आज विश्वचषक स्पर्धेतील सामना सुरु आहे. गेल्या सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेवर दमदार विजय मिळवत विजयी सलामी दिली होती. त्यामुळे आजच्या सामन्यात हीच विजयी लय कायम राखण्यासाठी भारतीय संघ आतुर असणार आहे. तर ऑस्ट्रेलियाचा हा या स्पर्धेतील तिसरा सामना आहे. या पूर्वीच्या दोन्ही सामन्यांत ऑस्ट्रेलियाने विजय मिळवला असल्याने भारतापुढे हे कडवे आव्हान असणार आहे.
विश्वचषकात भारतावर अधिराज्य गाजवणारा ऑस्ट्रेलिया संघ सध्या डळमळीत अवस्थेत असला तरी विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारताला रविवारी केनिंग्टन ओव्हल मैदानावर होणाऱ्या सत्त्वपरीक्षेला सामोरे जावे लागणार आहे. जवळपास वर्षभर संघर्ष करणाऱ्या ऑस्ट्रेलियाने स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर यांच्या पुनरागमनानंतर गेल्या काही महिन्यांत आपली कामगिरी उंचावली आहे. विश्वचषक स्पर्धेतही अफगाणिस्तान आणि विंडीजविरुद्धचे सामने जिंकत ऑस्ट्रेलियाने आपण सहाव्यांदा विश्वचषक उंचावण्यासाठी सज्ज असल्याचे दाखवून दिले आहे.
सामन्यात भारताचा कर्णधार विराट कोहली याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. “मी नाणेफेक जिंकली असती, तर मी देखील फलंदाजीलाच प्राधान्य दिले असते”, यावेळी ऑस्ट्रेलीयाचा कर्णधार आरोन फिंच म्हणाला. या सामन्यासाठी भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोघांच्याही संघात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. दोन्ही संघांनी आपला गेल्या सामन्यातील विजयी संघ कायम ठेवला आहे.