महानगरपालिकेतर्फे वाघांच्या बछड्यांचा धमाकेदार नामकरण सोहळा

महानगरपालिका सिद्धार्थ उद्यान व रेड एफ एम यांच्या संयुक्त विद्यमाने सिद्धार्थ उद्यान येथील दि २६ एप्रिल रोजी जन्मलेल्या वाघांचे ४ बछडे यांचा शहरातील व जिल्ह्यातील प्रथम नामकरण सोहळा आयोजित करण्यात आला होता .शहरातील नागरिकांकडून या नामकरण सोहळ्यासाठी नावे मागविण्यात आले होते .मा शिवसेना नेते श्री चंद्रकांत खैरे यांच्या हस्ते draw पध्दतीने नामकरण करण्यात आले .यात 1 नर व 3 मादी जातीच्या बचड्यांना नावे देण्यात आली अनुक्रमे कुश,अर्पिता,प्रगती,व देविका याप्रमाणे नावे ठेवण्यात आली आहेत. यावेळी शिवसेना जनसंपर्क प्रमुख विनोद घोसाळकर, आमदार मुंबई श्रीमती मनीषा कायंदे, महापौर नंदकुमार घोडेले, स्थायी समिती सभापती श्रीमती जयश्री कुलकर्णी , सभापती महिला व बाल कल्याण समिती श्रीमती मनीषा लोखंडे,माजी महापौर श्री त्र्यंबक तुपे,श्री गजानन बारवाल,मा.गटनेते श्री मकरंद कुलकर्णी, स.नगरसेवक श्री सचिन खैरे, श्री शिवाजी दांडगे ,श्री विजय वाघचौरे,श्रीमती सुनीता आऊलवार,मा शहर अभियंता श्री एस डी पानझडे,मा उद्यान अधीक्षक श्री विजय पाटील,श्री गोपीकिशन चांडक,समाजसेवक श्री अण्णा वैद्य ,रेड एफ एम चे आर जे रोहन,अर्चना ,अधिकारी,कर्मचारी ,व्याघ्र प्रेमी शहरातील नागरिक यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संचालन सांस्कृतिक अधिकारी संजीव सोनार यांनी केलेे.