News Updates : गल्ली ते दिल्ली , एक नजर, महत्वाच्या बातम्या

1. मुंबईः ईदचा चंद्र दिसला; उद्या साजरी होणार रमजान ईद
2. औरंगाबाद शहरातही बुधवारी साजरी होणार रमजान ईद
3. रमजान ईदनिमित्त राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडून देशवासीयांना शुभेच्छा
4. नवी मुंबईत सुसाट कारच्या धडकेने आई व मुलाचा मृत्यू .
5. पुणे – मुंबईतील हॉटेल व्यावसायिकाचा खुन करणाऱ्यास पुण्यातून अटक
6. नागपूर : तृतीयपंथी चमचमला ठार मारण्याचा प्रयत्न, आरोपी तृतीयपंथी उत्तम बाबा व त्याचे साथीदार ताब्यात.
7. भंडारा : गळफास घेतलेल्या अवस्थेत विवाहितेचा मृतदेह जंगलात आढळला. साकोली तालुक्याच्या गोंडउमरी जंगलातील घटना. खुनाचा संशय.
8. औरंगाबाद: साडेनऊ लाखांचे वाहनकर्ज बुडविल्याच्या प्रकरणातील आरोपी अमोल अशोक लोखंडे याची न्यायालयीन कोठडीत रवानगी
9. औरंगाबाद: बौद्ध लेणी परिसरात सोन्याच्या चेनसह ३३ हजारांचा ऐवज लुटल्याप्रकरणात आरोपी गणेश अण्णासाहेब बनसोडे याला शुक्रवारपर्यंत पोलिस कोठडी
10. कोल्हापूर : बलात्काराच्या गुन्ह्यातून तक्रार मागे घेण्यासाठी आई आणि मुलाला ठार मारण्याची धमकी देऊन १५ लाख रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी गांधीनगर पोलिसांत दोघांवर गुन्हा
11. राजस्थानः महिलेवर झालेल्या सामूहिक बलात्कारप्रकरणी ४ जणांना अटक