Mamata Banerjee : जो हमसे टकरायेगा , मिट्टी मे मिल जायेगा , मुस्लिम बांधवांनो निर्भीडपणे जगा

माझ्याशी जे कोणी टक्कर घेतील ते जमीनदोस्त होतील असा सूचक इशारा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी दिला आहे. ईदच्या पवित्र सणाच्या दिवशी मुस्लिम बांधवांना निर्भिडपणे जगण्याचा संदेशही त्यांनी दिला आहे. रमझान ईदच्या निमित्ताने ममता बॅनर्जींनी यावेळी मुस्लिम बांधवांना संबोधित केलं. ‘ महिनाभर तुम्ही रोजे बाळगले, परमेश्वराची सेवा केली. तुम्ही घाबरू नका, हादरूही नका. मी तुमच्यासोबत आहे. तुम्ही भयमुक्त होऊन या देशात जगा. हिंदूचा त्याग, मुसलमानांचा ईमान, ख्रिस्तींचे शिक्षण आणि शिखांच्या बलिदानाच्या पायावर उभा असलेला देश म्हणजे भारत आहे असंही यावेळी ममता बॅनर्जींनी ठणकावून सांगितलं.
या देशाचं रक्षण करणं माझं परम कर्तव्य असून जो कोणी आमच्या मार्गात येईल तो जमीनदोस्त होईल असंही त्यांनी सांगितलं. ‘ घाबरू नका ,कोणी कितीही वाईट विचार केला तरी अखेर तेच होतं जे परमेश्वराला मंजूर होतं. जितक्या लवकर सूर्याचे किरण प्रखर होतात तितक्याच लवकर उतरतात ही. ईव्हीएमचा हा ताप उतरायला वेळ लागणार नाही’. असा टोलाही त्यांनी मोदींना लगावला आहे. पुढच्या पश्चिम बंगालमध्ये निवडणुका आहेत. त्या पार्श्वभूमीवर अल्पसंख्यांकांची जास्तीजास्त मतं मिळवण्यासाठी ममता बॅनर्जी प्रयत्न करत आहेत.