News Updates : गल्ली ते दिल्ली , एक नजर , दुपारच्या बातम्या

1. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राजू शेट्टी यांनी विधानसभेला कोणासोबत जायचे हे आताच ठरवावेः अॅड. प्रकाश आंबेडकर.
2. उत्तर प्रदेशात होणाऱ्या विधानसभेच्या ११ जागेवरील पोटनिवडणुका बसपा स्वतंत्र लढणारः मायावती यांची घोषणा.
3. हवाई दलाचे एएन-३२ हे विमान बेपत्ता होऊन २० तास उलटले. सुखोई फायटर जेटने शोध मोहीम सुरूच.
4. मुंबईः राधाकृष्ण विखे पाटील आज आमदारकीचा राजीनामा देण्याची शक्यता. विखे यांचा लवकरच भाजपमध्ये प्रवेश होण्याची शक्यता.
5. मुंबईः राधाकृष्ण विखे पाटील यांच्या बंगल्यावर खलबत. जयकुमार गोरे, भारत भालके, रणजीत निंबाळकर बैठकीला उपस्थित.
6. भाजपच्या कमळ चिन्हावर विधानसभा निवडणूक लढवण्यास महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाचा नकार.
7. मुंबईः अॅन्टॉप हिल परिसरात दारूच्या नशेत मित्राने मित्राचा गळा चिरला. गुन्ह्याची नोंद, तपास सुरू.
8. मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याची सुनावणी गुरुवारपर्यंत तहकूब.
9. औरंगाबादः डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा कुलगुरू पदाचा अतिरिक्त कार्यभार डॉ. देवानंद शिंदे यांनी स्वीकारला
10.औरंगाबादः महापालिका स्थायी समिती सभापतीपदी भाजपच्या जयश्री कुलकर्णी यांची निवड
11. जालनाः अवैधरित्या गावठी पिस्तुल व तलवार बाळगणाऱ्या इसमास कारसह पकडले. स्थानिक गुन्हे शाखेची भल्या पहाटे २ वाजेच्या सुमारास चंदनझिरा भागात कारवाई
12. शिवरायांबद्दल आक्षेपार्ह ट्विट; पायल रोहतगीनं मागितली माफी
13. एमएचटी-सीईटी निकालः मुंबईच्या किमया शिकारखानेला ९९.९८ टक्के गुण. अमरावतीच्या सिद्धेश अग्रवालला ९९.९८ टक्के गुण