Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

विधानसभा २०१९ : भाजप-सेना फिफ्टी -फिफ्टी, मित्र पक्षांना १८ जागा

Advertisements
Advertisements
Spread the love

लोकसभा निवडणुकांपाठोपाठ शिवसेना-भाजप राज्यातील विधानसभा निवडणूकही एकत्र लढणार आहेत. त्यासाठी युतीचा फिफ्टी-फिफ्टीचा फॉर्म्युला ठरला असल्याची माहिती भाजपचे ज्येष्ठ नेते आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज दिली. राज्यात विधानसभेसाठी भाजप १३५ आणि शिवसेना १३५ जागांवर लढेल. मित्र पक्षांसाठी १८ जागा सोडण्यात येणार आहेत, असं चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलं.

Advertisements

मराठवाड्यातील दुष्काळी भागातील कामांचा आढावा घेण्यासाठी औरंगाबादमध्ये आले असता चंद्रकांत पाटील यांनी ही माहिती दिली. भाजप-शिवसेना विधानसभेत एकत्रच लढेल. त्यात कोणताही बदल होणार नाही. २८८ जागांवर युती लढेल. त्यातील १८ जागा या युतीतील मित्र पक्षांना सोडण्यात येतील. तर, पूर्वी ठरल्याप्रमाणे भारतीय जनता पार्टी १३५ जागांवर आपले उमेदवार उभे करेल. तेवढ्याच जागांवर शिवसेनेचे उमेदवार असतील. त्यामुळे युतीच्या या जागावाटपात काही बदल होणार नाहीत. विधानसभेलाही शिवसेना-भाजप, मित्रपक्ष एकत्रितपणे सामोरे जातील, असं चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलं.

Advertisements
Advertisements

खैरेंचा पराभव त्यांच्याच आमदाराने केला भाजपने नाही

शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांचा पराभव भाजपने केला नसून शिवेसनेच्याच आमदाराने केला आहे. शिवसेनेचेच आमदार राहिलेल्या हर्षवर्धन जाधव यांनी त्यांचा पराभव केला. त्यामुळे यात भाजपचा काही प्रश्न नाही, असं सांगत पाटील यांनी खैरे यांच्या पराभवाचं खापर शिवसेनेवर फोडलं. यावेळी भाजपचे आमदार अतुल सावे आणि डॉ. भागवत कराड आदी उपस्थित होते.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!