News Updates : गल्ली ते दिल्ली , एक नजर , महत्वाच्या बातम्या। ..

1. मुंबईः डॉक्टर पायल तडवी आत्महत्येप्रकरणी डाॅ. हेमा आहुजा, डाॅ अंकिता खंडेलवाल, डाॅ. भक्ती मेहर या तिन्ही महिला आरोपींना १० जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी, पोलिसांना कोठडी मिळवण्यात अपयश
2. राजस्थानच्या श्रीगंगानगरमध्ये देशातील सर्वाधिक तापमान, ४९.६ अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद
3. औरंगाबाद: अकरावीत ऑनलाइन प्रवेश घेतला तरच त्या विद्यार्थ्याला बारावीची बोर्डाची परीक्षा देता येणार, त्यामुळे शाळा, महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांचे प्रवेश ऑफलाइन घेऊ नये, शिक्षण विभागाची सूचना
4. औरंगाबाद: औरंगाबाद जिल्ह्यात गेल्या चार वर्षांत डागडुजी, डांबरीकरण न झालेल्या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने दिला ३०७ कोटींचा प्रस्ताव
5. पुणेः काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीबरोबर जायचे की नाही, याबाबतचा निर्णय वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर घेतील, आघाडीचे नेते गोपीचंद पडळकर यांची
6. दिल्लीः संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन १७ जून २६ जुलैदरम्यान, तर लोकसभेच्या अध्यक्षांची निवड १९ जूनला होण्याची शक्यता, सूत्रांची माहितीमाहिती
7. मुंबई : जेट एअरवेजचे माजी सीईओ विनय दुबे यांच्याविरोधात लुक आऊट सर्कुलर जारी करण्यात आले आहे.
8. नवी दिल्लीः राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांचे २० जूनला संसदेत अभिभाषण, ४ जुलैला आर्थिक सर्वेक्षण तर अर्थसंकल्प ५ जुलैला सादर होणार, केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांची माहिती
9. सोलापूर : सोलापूर शहर पोलीस आयुक्त पदाचा अंकुश शिंदे यांनी घेतला पदभार
10. बुलडाणा: ब्लॉस्टींगचे ट्रॅक्टर विहीरीत कोसळले, एक ठार, चार जखमी, एकाची प्रकृती गंभीर; मोताळा तालुक्यातील हिवरी शिवारातील घटना.
10. राकेश अस्थाना यांच्याविरोधातील लाच प्रकरणाची चौकशी करण्यास सीबीआयला 4 महिन्यांची मुदतवाढ
11. मायावती बसपच्या खासदारांची 3 जून रोजी बैठक घेणार; पक्षाचे वरिष्ठ नेतेही राहणार उपस्थित
12. अंबरनाथमधील पाईपलाईन रोडवर विचित्र अपघात; चढणीला ब्रेक फेल झाल्याने ट्रक नाल्यात उलटला