पती काशुराम लग्नात भलत्याच महिलेबरोबर नाचला , पत्नी भांडली आणि त्याने तिच्या डोक्यात घातली कुऱ्हाड !!

Shocking red stamp text on white
क्षणभराच्या रागातून कोण कुठल्या ठरला जाईल सांगता येत नाही . या रंगाचेही असेच झाले . समारंभात पटीने दुसऱ्या महिलेसोबत डान्स केल्याने भडकलेल्या पत्नीने नवऱ्याला जाब विचारला आणि या रागाचे पर्यवसन वादात झाले . पती पत्नीमधील हा वाद इतका वाढला कि , पतीने पत्नीची कुऱ्हाडीने वार करून हत्या केल्याची खळबळजनक घटना जयपूरमध्ये घडली आहे. काशूराम (६०) असं आरोपीचे नाव असून तो फरार आहे. भीखली असे त्याच्या मृत पत्नीचे नाव आहे.
जयपूरमधील टिंडोरी गावात राहणारे काशूराम २४ मे रोजी पत्नीसह एका नातेवाईकांच्या लग्न समारंभाला गेले होते. दरम्यान, एक नातेवाईकाने काशूराम यांना नाचण्याचा आग्रह केला. यामुळे काशूरामही इतरांबरोबर डान्स करू लागले. त्याचवेळी एका गाण्यावर नाचताना काशूराम आणि घोळक्यातील एक महिला समोरासमोर आली. दोघेही नाचण्यात दंग होते. आपला पती दुसऱ्या महिलेबरोबर डान्स करत असल्याचे पाहून पत्नी भीखली संतापली होती. घरी गेल्यावर भीखली व काशूराम यांच्यात या मुद्द्यावरून जोरदार वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की चिडलेल्या काशूरामने जवळच पडलेल्या कुऱ्हाडीने भीखलीवर वार केले. त्यात भीखलीचा जागीच मृत्यू झाला. तर भीखलीला रक्ताच्या थारोळ्यात पडलेले पाहून आरोपी काशूरामने घटनास्थळाहून पळ काढला. काशूरामविरोधात भा. दं. सं. कलम ३०२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फरार काशूरामचा पोलीस शोध घेत आहेत.