News Updates : गल्ली ते दिल्ली , एक नजर , महत्वाच्या बातम्या

1. महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल उद्या दुपारी एक वाजता जाहीर होणार, वेबसाईटवर पाहता येणार निकाल
2. सत्तेत आल्यानंतर सवर्ण गरिबांना १० टक्के आरक्षण देण्याचं काम सरकारनं केलं: पंतप्रधान मोदी
3. भिवंडी-कल्याण रोडवरील एका यंत्रमाग कारखान्याला आग, आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू
4. औरंगाबादः टंचाईसदृश गावांच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना दूध, अंडी, फळे, शिक्षण संचालनालयाचे आदेश
5. मुंबईः मातोश्रीवर शिवसेनेची बैठक, लोकसभा निवडणुकीत औरंगाबादमधून पराभतू झालेल्या चंद्रकांत खैरेंच्या पुनर्वसनाच्या शिवसेनेकडून हालचाली सुरू असल्याची चर्चा
6. मुंबईः डॉक्टर पायल तडवी रॅगिंग आणि आत्महत्या प्रकरणी नायर हॉस्पिटलला राज्य महिला आयोगाची नोटीस
7. औरंगाबादः पैठण रोडवरील माँ बाप दर्गाजवळ ट्रकमध्ये रसायने भरलेल्या बॉक्स व गोण्यांना आग, अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणली
8. मुंबईः डॉ. पायल तडवीच्या आत्महत्येस दोषी असणाऱ्यांविरोधात कारवाई करा, अशा विविध मागण्यांसाठी SFI,DYFI, जनवादी महिला संघटना आणि जाती अंत संघर्ष समितीची नायर रुग्णालयाबाहेर निदर्शने
9. देशात राजकीय अस्पृश्यता वाढलीय. आजही भाजपला अस्पृश्य समजलं जात आहे. – पंतप्रधान नरेंद्र मोदी
10. औरंगाबाद: जलकुंभावर अधिकाऱ्यांना मारहाण करणाऱ्यांना अटक करण्याच्या मागणीसाठी महापालिकेत अधिकारी- कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन
11. मनी लाँडरिंग प्रकरणी रॉबर्ट वाड्रा यांना मिळालेल्या जामिनाविरोधात ईडीच्या याचिकेवर दिल्ली हायकोर्टात सुनावणी, वाड्रा आणि त्यांचे निकटवर्तीय मनोज अरोरा यांना नोटीस, १७ जुलैला पुढील सुनावणी होणार
12. पुणे – ऊर्मिला मातोंडकर यांच्याबद्दल अश्लिल टिप्पणी करणाऱ्याविरोधात गुन्हा दाखल, विश्रामबाग पोलिसांची कारवाई
13. यवतमाळ : बारावीच्या विद्यार्थिनीची गळफास घेऊन आत्महत्या
14. सोलापूर : सांगोला तालुक्यात कॅनॉलमध्ये अंघोळीसाठी गेलेल्या तरुणाचा पाय घसरून पडल्याने पाण्यात बुडून मृत्यू
15. पेमा खांडू 29 मे रोजी अरुणाचल प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार- किरण रिजीजू
16. गोरेगाव पुलावर भारत पेट्रोलियमच्या टँकरला आग
17. औरंगाबाद: तेलंगणामधील आमदार राजा सिंग विरोधात प्रक्षोभक भाषण करून मुस्लीम समाजाच्या भावना दुखविल्याचा गुन्हा दाखल . २० मे रोजी झाली होती प्रचारसभा