धक्कादायक : मुकबधीर मुलीवर सामूहिक अत्याचार करून सोशल मीडियावर व्हिडीओ केला व्हायरल , दोन अटकेत

उत्तर प्रदेशातील रामपूर येथे एका मूकबधिर मुलीवर सामूहिक बलात्काराची घटना घडली आहे.१७ वर्षे वयाच्या या मुलीवर ३ जणांनी अत्याचार केल्याचे पोलिसांनी सांगितले. विशेष म्हणजे त्यांनी याचे चित्रीकरणही केले आहे.२३ मे रोजी हि घटना घडली. विकृती म्हणजे त्यांनी सोशलमीडियावर हा व्हिडीओ अपलोड केल्यानंतर हि घटना उघडकीस आली. याप्रकरणी दोघांना पोलिसांनी अटक केली असून एक जण फरार आहे. पीडित मुलीवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.