गोमांस बाळगल्याच्या संशयावरून श्रीराम सेनेच्या कार्यकर्त्यांची मुस्लिम इसमाला बेदम मारहाण

गोमांस बाळगल्याच्या संशयावरून श्रीराम सेनेच्या काही कार्यकर्त्यांनी एका मुस्लिम इसमाला मारहाण केल्याची घटना मध्य प्रदेशातील सिवनी जिल्ह्यात घडली आहे. संबंधित कार्यकर्त्यांनी त्याला ‘जय श्रीराम’ अशा घोषणा देण्यासाठीही बळजबरी केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही २२ मे रोजीची घटना असून या प्रकरणातील आरोपींना अटक करण्यात आली आहे.
प्रारंभी या कार्यकर्त्यांनी दिलेल्या माहितीवरून संबंधित मुस्लिम व्यक्ती आणि त्याच्या कुटुंबीयांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली त्यानंतर ज्या तरुणाला संशयावरून मारहाण करण्यात आली त्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्या व्यक्तीच्या बहिणीने पोलिसांना तिच्या भावाला केलेल्या मारहाणीची माहिती दिली तेंव्हा पोलिसांनी श्रीराम सेनेच्या सर्व तरुणांना अटक करून त्यांची तुरुंगात रवानगी केली.पोलिसांनी सांगितले कि, या तरुणांनी दहशत पसरविण्याच्या इराद्याने हा व्हिडीओ तयार करण्यात आला असावा. याप्रकरणी आम्ही तपास करीत आहोत.