नव्या सरकारचा कार्यकाळ सुरु होताच मोदींच्या विदेश दौऱ्यांचे वेळापत्रक तयार !! बघा कुठे निघालेत मोदी …

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पूर्वीचा कार्यकाळ अनेक गोष्टींनी गाजला, त्यातीलच एक म्हणजे त्यांचे विदेश दौरे. मोदींनी आपल्या कार्यकाळात जवळजवळ प्रत्येक देशाचा दौरा केला, यासाठी करोडो रुपये खर्च झाले. माध्यमांसहित विरोधकांनीही टीका करताना प्रत्येक वेळेस हा मुद्दा उचलून धरला होता . आता नरेंद्र मोदी ३० मे रोजी दुसऱ्यांदा आपल्या पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत, पण त्याआधीच त्यांचे या वर्षातील परदेशी दौऱ्याचे वेळापत्रक जाहीर झाले आहे.
पुढील ७ महिन्यांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ७ देशांचे विदेशी दौरे आखले गेलेले आहेत. यामध्ये किरगिझस्तान, जपान, फ्रान्स , रशिया , थायलंड , ब्राझिल आणि जवळपासच्या देशांचा समावेश आहे. या भेटीमुळे पंतप्रधान जागतिक नेत्यांशी संवाद साधून आपल्या परराष्ट्र धोरणाच्या कृतींचा आराखडा बांधतील असे सांगण्यात येत आहे. दरम्यान, जपानचे पंतप्रधान शिन्जो अबे, जर्मनीचे चांसलर अँजेला मेर्केल, पुतिन आणि शी जिनपिंग हे महत्वाचे चार नेते भारत दौऱ्यावर येण्याची शक्यता आहे.
असे आहेत नरेंद्र मोदी यांचे दौरे…
जूनः किरगिझस्तान, जपान
पंतप्रधानपदाची शपत घेतल्यानंतर नरेंद्र मोदी दोन परदेशी कार्यक्रमांना हजेरी लावतील. 13 जून ते 15 जून दरम्यान एससीओ समेट बिश्केक, किरगिझस्तान आणि जपानमधील ओसाका येथील जी 20 शिखर जे 28 ते 2 9 दरम्यान सुरू होणार आहे.
ऑगस्ट : फ्रांस
25 ते 27 ऑगस्ट दरम्यान पंतप्रधान फ्रांस येथील G7 समेटला हजेरी लावतील.
सप्टेंबर – रशिया
4 ते 6 सप्टेंबर दरम्यान इस्टर्न इकोनॉमिक फोरममध्ये सहभागी होण्यासाठी पंतप्रधान मोदी रशियाला जात आहेत.
नोव्हेंबरः थायलंड, ब्राझील
नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये पंतप्रधान मोदी बँकॉक पूर्व आशिया शिखर बैठकीत सहभागी होतील. त्यानंतर 11-13 नोव्हेंबर रोजी ब्राझीलमध्ये ब्रिक्स परिषदेचे आयोजन केले आहेत, त्यासाठी तिकडे त्यांचे प्रस्थान होईल.