News Updates : गल्ली ते दिल्ली , एक नजर , महत्वाच्या बातम्या …

1. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतली राष्ट्रपती भेट. मंत्रिमंडळ बरखास्तीची पंतप्रधान मोदींची राष्ट्रपतींना शिफारस. राष्ट्रपतींनी शिफारस स्वीकारत नवीन सरकार सत्तेत येईपर्यंत मोदींकडे हंगामी पंतप्रधानपदाची जबाबदारी सोपली
2. नरेंद्र मोदी 30 मे रोजी पंतप्रधानपदाची शपथ घेणार
3. भाजपानं 303 जागा जिंकल्या; अरुणाचल प्रदेश पश्चिम मतदारसंघात भाजपाचा विजय
4. खामोश! कुछ तो गडबड है; काँग्रेस नेते शत्रुघ्न सिन्हा यांचा निकालावर संशय
5. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी अमेठीतील पराभवानंतर होते राजीनाम्याच्या विचारात, सोनिया गांधी यांनी समजूत काढल्याने निर्णय मागे
6. सूरत कोचिंग सेंटरमधील लागलेल्या आगीतील मृतांचा आकडा 20 वर
7. पतंप्रधान मोदींनी सरकारमधील मंत्र्यांना निरोप देत मानले आभार
8. इव्हांका ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे केले अभिनंदन
9. मोदी-शहांनी घेतली आडवाणी, मुरली मनोहर जोशींची भेट
10. पुणेः पाणी समजून डिझेल प्यायल्याने दीड वर्षाच्या मुलाचा मृत्यू
11. अहमदनगरः नगर-औरंगाबाद महामार्गावर नगर शहरात सनी पॅलेस हॉटेलजवळ कंटेनरने चिरडल्याने दोघे जागीच ठार
12. औरंगाबादः चिकलठाणा पोलिस ठाणे हद्दीत विवाहितेचा दगडाने ठेचून खून, सोनाली शिंदे असं महिलेचं नाव. पतीला अटक
13. भाजपची हिंदुत्व कार्डाची खेळी यशस्वी ठरली, गोडसेला देशभक्त बोलणारी जिंकली; असदुद्दीन ओवेसी यांची प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यावर टीका
14. लोकसभा निवडणुकीत भाजपच्या विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांचे घेतले आशीर्वाद…
15. महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल 2019: माझी स्पर्धा अडसुळांशी नव्हती, मोदींशी होती! – नवनीत राणा