प्रकाश आंबेडकर यांचा पराभव झाल्यास भाजपचे एकही कार्यालय शिल्लक राहणार नाही, भीम आर्मीचा इशारा

https://www.facebook.com/PrakashAmbedkar.Official/videos/1153301231538233/
निवडणुकीचे निकाल काहीही आले, तरी हिंसाचार होणार नाही ह्याची काळजी घ्या..भिम आर्मीचा हिंसाचार आम्हाला मान्य नाही, कार्यकर्त्यांनी बळी पडू नये.
लोकसभा निवडणुकांचे निकाल हाती येण्यास काही तास शिल्लक आहेत. मात्र आधी ईव्हीएमवरून संशय व्यक्त झाल्यानंतर आता थेट हिंसेचे इशारे देण्यात येत आहेत. सोलापूर लोकसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रकाश आंबेडकर यांचा पराभव झाल्यास तोडफोड करण्याची धमकी भीम आर्मीने दिली आहे. दरम्यान, भीम आर्मीच्या या इशाऱ्यानंतर आंबेडकर यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना शांत राहण्याचे आवाहन केले आहे.
सोलापूर लोकसभा मतदारसंघात आंबेडकर यांच्याविरोधात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे तर भाजपकडून डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य रिंगणात आहेत. आंबेडकर यांचा या निवडणुकीत पराभव झाल्यास भाजपचे एकही कार्यालय शिल्लक राहणार नाही, असा इशारा भीम आर्मीने दिला आहे.
सोलापूर लोकसभा मतदारसंघातून प्रकाश आंबेडकर यांनी निवडणूक लढवली आहे. या मतदारसंघातील निकाल विरोधात गेल्यास भाजपाचंएकही कार्यालयं ठेवणार नाही. भाजपाच्या नेत्यांना फिरू देणार नाही, असा इशारा भीम आर्मीनं दिला. सोलापूरात आंबेडकर यांच्या विरोधात भाजपाचे डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे रिंगणात आहेत.
निवडणुकीचे निकाल काहीही आले, तरी हिंसाचार होणार नाही ह्याची काळजी घ्या..
भीम आर्मीच्या धमकीनंतर प्रकाश आंबेडकर यांनी शांतता राखण्याचं आवाहन केलं. एका व्हिडीओच्या माध्यमातून त्यांनी हे आवाहन केलं. ‘निवडणुकीचे निकाल काहीही लागले, तरी हिंसाचार होणार नाही याची काळजी घ्या. भीम आर्मीचा हिंसाचार आम्हाला मान्य नाही. त्याला कार्यकर्त्यांनी बळी पडू नये,’ असं आवाहन आंबेडकरांनी केलं. शांततेचा भंग होणार नाही, याची काळजी घ्या. कोणत्याही राजकीय पक्षाच्या कार्यालयाचं नुकसान होणार नाही, याची दक्षता घ्या, असं आवाहन त्यांनी व्हिडीओच्या माध्यमातून केलं.