२२ कॅमेरे आणि गुप्तहेराच्या विळख्यात ठेवल्याचे पतीचे उद्द्योग समजताच तिने घातली त्याच्या डोक्यात बॅट ….

घरात २२ कॅमेरे लावून पत्नीच्या मागावर गुप्तहेर लावणाऱ्या इंजिनियर पतीच्या डोक्यात बॅट घातल्याची धक्कादायक घटना बेंगळुरू शहरात घडली आहे . पत्नीच्या चारित्र्याचा संशय पतीला आला होता. त्यामुळे त्याने हे कारनामे केले होते . मात्र चारित्र्याच्या संशयातून आपल्या पत्नीमागे खासगी गुप्तहेरामार्फत आणि गुप्त कॅमेरे लावून पाळत ठेवण्याचे उद्योग पतीला चांगलेच महागात पडले आहे . आता या जोडप्याने घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सदर पती हा सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. पत्नीच्या चारित्र्यावर संशय असल्याने त्याचा छडा लावण्यासाठी त्याने घरात तब्बल २२ छुपे कॅमेरे लावले होते. याचे नियंत्रण तो आपल्या मोबाइलवरून करत असे. पत्नी बाहेर पडल्यानंतर तिच्यावर नजर ठेवण्यासाठी एका खासगी गुप्तहेराचीही नियुक्ती त्याने केली होती. हा सर्व प्रकार पत्नीच्या लक्षात आल्यावर तिने क्रिकेटची बॅट पतीच्या डोक्यात घातली.
२००७ मध्ये होणाऱ्या पत्नीला पाहायला गेलेल्या तरुणाला तिची बहीण पसंत पडली. बहिणीशी लग्न लावून देण्याचा प्रस्तावही त्याने संबंधित कुटुंबियांसमोर ठेवला. मात्र, कुटुंबियांनी या गोष्टीला नकार दिला. तरीही सलग ३ वर्षे तो तिचा पाठलाग करत राहिला. अखेर २०१० मध्ये दोघांनी लग्न केले. या दोघांच्या वयात ११ वर्षांचे अंतर आहे. काही वर्षानंतर पत्नीच्या चारित्र्यावर संशय आल्यामुळे त्याचा तपास करण्यासाठी त्याने हे कृत्य केले. बेंगळुरू पोलिस आयुक्त कार्यालयातील समुपदेशक असलेल्या विनिता सहयावानी यांनी याप्रकरणी माहिती दिली.