एक्झिट पोल बकवास : सतर्क राहा , राहुल गांधी यांचा कार्यकर्त्यांना संदेश

कांग्रेस पार्टी के प्रिय कार्यकर्ताओं ,
अगले 24 घंटे महत्वपूर्ण हैं। सतर्क और चौकन्ना रहें। डरे नहीं। आप सत्य के लिए लड़ रहे हैं । फर्जी एग्जिट पोल के दुष्प्रचार से निराश न हो। खुद पर और कांग्रेस पार्टी पर विश्वास रखें, आपकी मेहनत बेकार नहीं जाएगी।
जय हिन्द।
राहुल गांधी
— Rahul Gandhi (@RahulGandhi) May 22, 2019
एक्झिट पोलच्या निकालामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये आलेली निराशा झटकण्यासाठी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी कंबर कसली आहे. निकालाला अवघे काही तसा उरलेले असतानाच राहुल यांनी ट्विट करून काँग्रेस कार्यकर्त्यांना घाबरून न जाण्याचं आणि सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे. त्याआधी काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी यांनीही एका ऑडियो मेसेजद्वारे कार्यकर्त्यांना दक्ष राहण्याचं ‘आगामी २४ तास खूप महत्वाचे आहेत. त्यामुळे सतर्क आणि दक्ष रहा. घाबरू नका. तुम्ही सत्यासाठी लढत आहात. खोट्या एक्झिट पोलच्या प्रचारामुळे निराश होऊ नका. स्वत:वर आणि काँग्रेस पक्षावर विश्वास ठेवा. तुमचे श्रम वाया जाणार नाहीत,’ असं राहुल यांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. प्रियांका यांनीही अफवा आणि एक्झिट पोलवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन काँग्रेस कार्यकर्त्यांना केलं होतं. स्ट्राँग रूम आणि मतदान केंद्रावर ठाण मांडून बसण्याच्या सूचनाही प्रियांका यांनी कार्यकर्त्यांना केल्या होत्या.