Bad News : खेळता खेळता चार्जर तोंडात घातल्याने चिमुकलीचा मृत्यू

मोबाइल फोनचा चार्जर तोंडात घातल्याने लागलेल्या वीजेच्या धक्क्याने एका चिमुकलीला आपला जीव गमवावा लागला आहे. शेहवर असे या चिमुकलीचे नाव आहे. घरात चार्जिंगसाठी लावलेला मोबाइल फोन चार्ज झाल्यानंतर काढण्यात आला मात्र, बटन बंद करण्याचे विसरल्याने हा प्रकार घडला. लहानग्या शेहवरला घेऊन तिची आई रझिया जहांगिराबादला माहेरी आली होती. रझिया यांचे अंसारीयान कॉलनी येथे माहेर आहे. शनिवारी घरातील कुणीतरी आपला मोबाइल चार्ज करण्यासाठी चार्जरला लावला होता. काही वेळाने त्या व्यक्तीने मोबाइल चार्जरमधून काढला, मात्र चार्जर तसाच ठेवून ती व्यक्ती स्विच ऑफ करायचेही विसरून गेली. खेळता खेळता शेहवरने चार्जरच्या वायरचे टोक तोंडात घातले आणि तिला वीजेचा धक्का बसला. यात चिमुकलीचा मृत्यू झाला.