News Updates : गल्ली ते दिल्ली , एक नजर , महत्वाच्या बातम्या

1. कोलकाताः आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींची भेट घेतली
2. औरंगाबादः दुष्काळी मदतीसाठी काँग्रेसचे करमाड (ता. औरंगाबाद) येथे रास्ता रोको आंदोलन
3. औरंगाबादः पाणी पुरवठा योजनेला संरक्षण द्या, महापौर नंदकुमार घोडेले यांची पोलीस अधिक्षकांकडे मागणी, अन्नदाता शेतकरी संघटनेने जायकवाडी येथून शहराचा पाणी पुरवठा तोडण्याचा इशारा दिल्याने महापौरांची मागणी
4. औरंगाबाद: मिटमिटा रोडवर हायवाच्या धडकेने दुचाकीस्वार मुलीचा मृत्यू
5. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू उद्या 21 विरोधी पक्षाच्या नेत्यांसह निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना भेटणार
6. आम्ही बहुमत चाचणीस सामोरे जाण्यास तयार- मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ
7. जळगाव : वनपालासह दोघांना चार वर्ष सक्तमजुरी; पाच हजार रूपयांची घेतली होती लाच
8. पश्चिम बंगाल- भाटपारा भागात अमर्यादित काळासाठी संचारबंदी लागू; हिंसाचार झाल्यानं प्रशासनाचा निर्णय
9. विवेक ओबेरॉयला वादग्रस्त ट्विट प्रकरणी राष्ट्रीय महिला आयोगाची नोटीस
10. रत्नागिरी – संगमेश्वर तालुक्यातील आंबवलीत दोन मुलांसह वडिलांचा बुडून मृत्यू
11. सरकार स्थापन करणाऱ्या पक्षाला किंवा पक्षांच्या आघाडीला पाठिंबा देऊ- बिजू जनता दल
12. घाटकोपरमध्ये गोळीबार, बबलू दुबे या तरुणाची गोळी घालून हत्या, दोन संशयित ताब्यात.