छत्तीसगड: सुकमामध्ये आयईडी स्फोट; २ जवान गंभीर जखमी

छत्तीसगडसह महाराष्ट्रातील गडचिरोलीमध्ये नक्षली कारवाया सुरूच आहेत. सुकमा जिल्ह्यातील गोगुंडाजवळ माओवाद्यांनी आज भूसुरुंग स्फोट घडवून आणला. यात जिल्हा राखीव दलाचे (DRG) दोन जवान जखमी झाले आहेत. दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याचं वृत्त आहे. भूसुरुंग स्फोटात जिल्हा राखीव दलाचे दोन जवान गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी विमानानं रायपूर येथे हलवण्यात येत आहे, अशी माहिती सुकमाचे सहायक पोलीस अधीक्षक शालभ सिन्हा यांनी दिली. दरम्यान, याआधी १ मे रोजी नक्षलवाद्यांनी गडचिरोलीमध्ये भूसुरुंग स्फोट घडवून आणला होता. यात सुरक्षा दलाचे १५ जवान शहीद झाले होते.