भाजपला यावेळी १०० चा आकडा पार करणे देखील जड जाईल , ममतांचे भाकीत

लोकसभेत भाजपला ३०० हून अधिक जागा मिळेल असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्याकडून करण्यात आला असला तरी भाजपला यावेळी १०० चा आकडा पार करणे देखील जड जाईल, असं पश्चिम बंगाल च्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे . कुणाचा दावा खरा ठरणार हे येत्या २३ मे रोजीच कळणार आहे.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्या रोड शोमध्ये हिंसा झाल्यापासून शाह आणि ममता यांच्यातील संघर्ष शिगेला पोहोचला आहे. या पार्श्वभूमीवर यंदाच्या लोकसभेतील आपली लाट २०१४ पेक्षा मोठी असेल असा मोदींनीकेलेला दावा ममतांनी खोदून काढला असून त्यांनी भाजपवर पुन्हा एकदा शरसंधान केले आहे. पैशांच्या जोरावर भाजपकडून मतं खरेदी करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. भाजप ही गुंडांची पार्टी असल्याचे सांगत, भाजपकडून ३०० जागा जिंकण्याचा दावा करण्यात येत आहे. मात्र परिस्थिती वेगळीच असल्याचे ममता म्हणाल्या. त्यांच्यामते भाजपला आंध्रप्रदेश आणि तामिळनाडूमध्ये भोपळाही फोडता येणार नाही. तर महाराष्ट्रात २० जागा मिळविण्यात भाजपला यश येईल. या निवडणुकीत भाजपला २०० जागांचे नुकसान होईल, असं भाकीतही ही ममता यांनी केले आहे.