दीड लाखात मागास अल्पवयीन मुलीला विकत घेऊन सामूहिक बलात्कार ९ जण अटकेत !!

file pic
मध्यप्रदेशातील एका १४ वर्षांच्या मागासवर्गीय मुलीला तिच्याच नातेवाईकांनी दीड लाख रुपयात विकले आणि तीन पुरुषांनी राजस्थानातील अनेक जिल्ह्यांमध्ये तिच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अल्वरचे मागासवर्गीय महिलेच्या बलात्काराचे प्रकरण ताजे असताना ही घटना घडली असल्यामुळे राजस्थानात खळबळ माजली आहे. याप्रकरणी ९ जणांना अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित मुलगी मध्यप्रदेशातील नरसिंहपूर जिल्ह्याची रहिवाशी आहे. तिची आई मतिमंद असून तिचे वडील आंधळे आहेत. या मुलीच्या नातेवाईकांनी तिच्या आई-वडिलांना मुलगी विकण्याची गळ घातली होती. त्यानुसार एक दिवशी या मुलीची विक्री करण्यात आली. तिला विकत घेणारे दोन पुरुष तिला भरतपूरला घेऊन आले. या दोघांनी तिच्यावर भरतपूर, ढोलपूर,करौली आणि जयपूर येथे बलात्कार केला. मला आई-वडिलांकडे जाऊ द्या अशी मागणी पुन्हा पुन्हा तिने त्या नराधमांकडे केली. पण त्यांनी तिचे काहीच ऐकले नाही. जयपूरला आणल्यानंतर राम दयाल नावाच्या इसमाला तिला विकण्यात आले.
राम दयालने तिच्यावर बलात्कार करून तिला घरात डांबून ठेवले. एक दिवशी राम दयाल घरात नसताना पीडितेने तिथून पळ काढला आणि जवळचे पोलीस स्टेशन गाठले. या पोलीस स्टेशनात गेल्यावर तिने त घडलेला सगळा वृतांत सांगितला. तिच्यावर बलात्कार करणाऱ्या दोघांचे आणि तिच्या नातेवाइकांचे फोन नंबर तिच्याकडे होते. या नंबरच्या साहाय्याने पोलिसांनी आरोपींचा छडा लावला आहे. भरतपूर, धौलपूर, करोली या गावांमध्ये असंख्य गरिब मुलींना देहविक्रयात सक्तीने ढकललं जात असल्याची माहितीही पोलिसांना या मुलीने दिली आहे. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.