एका चपातीसाठी त्याने निद्रावस्थेतील मालकिनीच्या गळ्यावर पाच मिनिटे सुरा फिरवला आणि मग पुढे काय झाले ? पहा….

नोकराने मालकाच्या हत्या करण्याच्या अनेक घटना घडतात त्यांची कारणेही अनेक असतात परंतु या घटनेत जेवणात एक चपाती कमी देत असल्यामुळे नोकराने मालकीणीची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. काम केल्यामुळे जास्त भूक असायची पण पोटभर जेवण मिळत नसल्यामुळे मालकीणीची हत्या करण्यात आली आहे. या घटनेनंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
आरोपी म्हणाला की,मला चार चपात्यांनी भूक असायची पण मालकीण फक्त ३ चपात्या द्यायची त्यामुळे त्याला उपाशी रहावं लागायचं. त्याच रागात आपण मालकीणीची गळा चिरून हत्या केली’ अशी कबुली आरोपीने पोलिसांना दिली आहे. त्यानंतर पोलिसांनी आरोपीवर हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. या सगळ्या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
राजेश पासवान असं आरोपीचं नाव आहे. त्याने २६ वर्षांची मालकीण रोजीची हत्या केली. दिपांशू असं रोजीच्या पतीचं नाव आहे. आरोपीने कोर्टात दिलेल्या कबुलीनुसार, ‘जेव्हा दिपांशूचा विवाह झाला नव्हता. तेव्हा मी त्यांच्या घरी स्वयंपाक बनवायचो. त्यावेळी मला हवं ते मी खायचो. पण मागच्या वर्षी दिपांशूचा विवाह झाला. तेव्हापासून मला खाण्याबाबतीत त्रास दिला जाऊ लागला.’
सगळ्यात धक्कादायक म्हणजे मालकीणीची हत्या केल्यानंतर आरोपीनेच सगळ्या घरच्यांना आणि शेजाऱ्यांना फोन करून बोलावून घेतलं. बरं इतकंच नाही तर सगळे घरी आले तेव्हा आरोपी नोकर मालकीणीला पाणी पाजत असे अशी माहिती कुटुंबीयांकडून देण्यात आली आहे. पण या प्रकरणाची पोलिसांनी कसून चौकशी केली तेव्हा आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली.
आरोपीने कबुली जबाबात म्हटले आहे कि,माझ्या वडिलांचं निधन झालं त्यावेळी मी गावी गेलो. तिथून आल्यानंतर माझ्या हिस्स्यातील एक चपाती मला कुत्र्याला द्यावी लागायची. अनेक वेळा भूक लागली असताना जेवण दिलं नाही. त्यामुळे मला प्रचंड राग आला. त्यानंतर त्या अंथरूणात असतानाच त्यांची गळा चिरून हत्या केली. त्यावेळी मी ५ मिनिटं रोजीच्या गळ्यावर चाकू फिरवला आणि मग हत्या केली.’