मोदी नेता नव्हे अभिनेता, त्यापेक्षा बीग बी चांगले पंतप्रधान झाले असते : प्रियांका गांधी

मिर्झापूर मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार ललितेश त्रिपाठी यांच्या प्रचारार्थ प्रियंका गांधी यांनी येथे जनसभेला संबोधित केले. पंतप्रधान मोदी हे नेते नाही, अभिनेते आहेत. जागतिक स्तरावरील सर्वात मोठ्या अभिनेत्याला आपण पंतप्रधानपदी बसवले आहे. यापेक्षा बीग बी अमिताभ बच्चन यांना पंतप्रधानपदी बसवायचे होते. तसंही जनतेसाठी कामे करायची नव्हती, अशा शब्दांत प्रियंका गांधी यांनी फिरकी घेतली.
नरेंद्र मोदी पुढील पाच वर्षांसाठी पुन्हा पंतप्रधान झाले, तर नवा चित्रपट पाहावा लागेल. पंतप्रधान मोदी निवडणुका आल्या की, नव्या गोष्टी रचतात. जनतेसाठी काम करणाऱ्याला मतदान करायचे की, विकासाच्या केवळ गप्पा करणाऱ्यांना मत द्यायचे. यामुळे विचारपूर्वक मतदान करा, असे आवाहन प्रियंका यांनी यावेळी केले.