नागराज मंजुळे यांच्या कोण होणार करोडपतीची प्रतिक्षा संपली

बहुचर्चित ‘कोण होणार करोडपती ‘ या मराठी आवृत्ती मधील मालिकेचे सूत्रसंचालन प्रसिद्ध सिने दिग्दर्शक नागराज मंजुळे करणार असल्याचे आधीच जाहीर झाले होते त्यानुसार पहिल्या भागाची तयारी पूर्ण झाली असून कोण होणार करोडपती याचा पहिला भाग २७ मेपासून सुरू होत असल्याचे वृत्त आहे.
मिळालेल्या माहितीनुसार ‘कोण होणार करोडपती’ चा पहिला भाग येत्या २७ मे रोजी रात्री ८.३० वाजता टीव्हीवर प्रदर्शित होत आहे. सोनी मराठी वाहिनीने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत हे जाहीर केलंय. ‘आमचे प्रश्न आणि तुमची उत्तरं सुरु होत आहेत २७ मेपासून ! बघायला विसरू नका ‘कोण होणार करोडपती’ सोमवार ते गुरुवार, रात्री ८.३० वाजता …फक्त सोनी मराठीवर!’ अशी पोस्ट त्यांनी चाहत्यांसोबत शेअर केली आहे.
‘कोण होणार करोडपती’ च्या माध्यमातून दिग्दर्शक नागराज मंजुळे छोट्या पडद्यावर पदार्पण करत आहे. शिवाय, तो या नव्या भूमिकेतही दिसणार आहे. इतकंच नव्हे तर तो करोडपतीचं टायटल ट्रॅकही त्याला गायला सांगितलंय. विशेष म्हणजे हे रॅप साँग असणार आहे.