बैल गेला अन् झोपा केला, सरकारकडून रिक्त पदांची माहिती मिळविण्यासाठी निघाले परिपत्रक

पंतप्रधान कार्यालयाच्या आदेशानंतर केंद्रीय कर्मचारी सध्या कामाला जुंपले आहेत. मंत्रालये आणि विभागांमधील रिक्त पदांची माहिती गोळा करण्याचे काम सुरू आहे. नव्याने रोजगार निर्मिती आणि रिक्त पदांवर नियुक्त्या करण्यात मोदी सरकार अपयशी ठरल्याचा आरोप विरोधकांकडून होत असल्यानं पंतप्रधान कार्यालयानं हे पाऊल उचललं आहे.
पंतप्रधान कार्यालयाच्या निर्देशानंतर मंत्रालये आणि सर्व विभागांमध्ये अंतर्गत परिपत्रक काढून रिक्त पदांची संख्या आणि त्यासंबंधीची माहिती मागवण्यात आली आहे. तसंच लवकरच यासंबंधी पंतप्रधान कार्यालयाद्वारे एक महत्वाची बैठक बोलावण्यात येईल आणि विविध विभागांमधील रिक्त पदांबाबत चर्चा करण्यात येईल, असं अर्थ मंत्रालयाला सूचित करण्यात आलं आहे. ३० एप्रिल २०१९ पर्यंत रिक्त असलेल्या पदांबाबत माहिती मागवण्यात आली आहे.