मुंबईकर सनीचा न्यूयॉर्कमध्ये डंका, न्यूयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिवलमध्ये सर्वोत्कृष्ट बालकलाकार म्हणून गौरव

मुंबईतील सांताक्रुझमधील कलिना झोपडपट्टीत राहणाऱ्या सनी पवार या अकरा वर्षीय मुलाला न्यूयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिवलमध्ये सर्वोत्कृष्ट बालकलाकार म्हणून गौरवण्यात आलं. ‘चिप्पा’ या हॉलिवूड चित्रपटातील भूमिकेसाठी त्याला हा पुरस्कार मिळाला आहे.
कलिना येथील कुर्वे नगर झोपडपट्टीत सनी राहतो. सनी हा अत्यंत गुणी कलाकार आहे. सनीने अमेरिकेतील न्युयॉर्क येथील 19 व्या New York Indian film festival 2019 मध्ये सर्वोत्कृष्ट बालकलाकार म्हणून गौरवण्यात आले. ‘चिप्पा’ या हॉलिवूड चित्रपटासाठी त्याला हा पुरस्कार मिळाला आहे. स्त्यावर राहणाऱ्या एका लहान मुलाच्या इच्छा-आकांक्षांची कथा ‘चिप्पा’मध्ये आहे. कोलकात्याच्या रस्त्यावर राहणाऱ्या लहान मुलाची रंजक गोष्ट या चित्रपटात आहे.
” मला माझ्या आई वडिलांसाठी अलिशान घर घ्यायचं आहे. माझे सिनेसृष्टीत जाण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आई-वडिलांनी फार कष्ट घेतले आहेत. म्हणूनच मला त्यांची सर्व स्वप्न पूर्ण करायची आहेत”, अशा शब्दात आई वडिलांबाबत सनीने प्रतिक्रिया दिली.
सनी पवार हा मुंबईतील सांताक्रूझच्या कलीना परिसरातील कुर्वे नगर झोपडपट्टीत राहतो. त्याचे वडील मुंबई महापालिकेत सफाई कर्मचारी म्हणून काम करतात. दिग्दर्शक गार्थ डेव्हिस यांच्या २०१६मधील ‘लायन’ या हॉलिवूडपटातही काम केले आहे. ‘लायन’ या हॉलिवूड चित्रपटाच्या देव पटेलच्या बालपणाची व्यक्तीरेखा साकारली सनीने आहे.
सनीला एएसीटीए पुरस्कारांतर्गत सर्वोत्कृष्ट अभिनेता, आशिया-पॅसिफिक स्क्रीन पुरस्कारांतर्गत विशेष नामोल्लेख ग्रॅण्ड ज्युरी पुरस्कार आणि बालकलाकार पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. लायन’ सिनेमासाठी सनीला समीक्षक निवड (स्पेशल ज्युरी अॅवॉर्ड) पुरस्कारांतर्गत सर्वोत्कृष्ट बालकलाकार श्रेणीतही नामांकन मिळाले होते.
सध्या जगभर गाजत असलेल्या सनीच्या ‘चिप्पा’ सिनेमात त्याच्यासोबत चंदन रॉय सन्याल, मसूद अख्तर, सुमीत ठाकूर आणि माला मुखर्जी यांनी प्रमुख सहाय्यक भूमिका वठवल्या आहेत.