हनी ट्रॅप मध्ये अडकून पाकिस्तानला गुप्त माहिती पुरविणारा जवान अटकेत

भारतीय सैन्यातील एक जवान पाकिस्तानला गोपनीय माहिती पुरवत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या जवानाला पाकिस्तानकडून हनी ट्रॅपमध्ये अडकविण्यात आले होते. यामुळे इंटेलिजेंस ब्यूरो (IB), मिलिट्री इंटेलिजेंस आणि पोलीसांनी संयुक्त कारवाई करत या जवानाला अटक केली आहे. एनआयएने दिलेल्या वृत्तानुसार हा जवान भारतीय सैन्यात लिपीक पदावर काम करत होता. त्याची माहिती देण्यात आली नसून तो मध्य प्रदेशच्या महू कॅन्टोन्मेन्टमध्ये इन्फंट्री बटालियनमध्ये कार्यरत होता.