News Updates : गल्ली ते दिल्ली , एक नजर , महत्वाच्या बातम्या

१. काँग्रेसचे नेते मणिशंकर अय्यर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नीच बोलल्याचं योग्य होतं असं मणिशंकर अय्यर यांनी म्हटलं होतं. त्यांच्या या विधानानंतर पंतप्रधान मोदी यांनी सडकून टीका केली. काँग्रेसने या अंहकारामुळेच राज्यावर 70 वर्ष राज्य केलं, अशी टीका त्यांनी केली.
२. कोलकात्यातील रक्तरंजित राड्यानंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी घटनास्थळाला भेट परिस्थितीचा आढावा घेतला.
३. गर्भलिंग निदान केल्याप्रकरणी २०११ तील स्टिंग ऑपरेशनमध्ये पकडलेल्या डॉ. नीना मथरानी यांना तीन वर्षांची सक्तमजुरी आणि 10 हजार रुपये दंड.
४. मोदी जंगलातले नव्हे, सर्कशीतले सिंह- पंजाबचे मंत्री मनप्रीत सिंग
५. पश्चिम बंगालमध्ये लोकशाही पायदळी, ममतांना जनताच नमविणार, देवेंद्र फडणवीस यांची कोलकातातील भाजप कार्यकर्त्यांवरील लाठीचार्जच्या घटनेवर प्रतिक्रिया
६. नागपूरः अनैतिक संबंधातून गर्भधारणा झाल्याच्या संशयातून पत्नीची गळा आवळून हत्या, झोपेच्या गोळ्या घेऊन पतीचा आत्महत्येचा प्रयत्न. झिंगाबाई टाकळीतील घटना. दीपाली योगेश राऊत (वय ३०) असे मृत पत्नीचे नाव तर योगेश नत्थू राऊत असे पतीचे नाव
७. पालघरः बोईसर औद्योगिक वसाहतीत आरती ड्रग्स लिमिटेड रासायनिक करखान्यात दुपारी विषारी वायूची गळती, वायुगळतीच्या त्रासामुळे चार महिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल
८. जेट एअरवेज भीषण संकटात, सकाळी सीएफओच्या राजीनाम्यानंतर सायंकाळी सीईओ विनय दुबे, सचिव कुणाल शर्मा यांचाही राजीनामा
९. श्रीनगरः लहान मुलीवरील बलात्काराच्या घटनेनंतर काश्मीरमध्ये तणाव कायम . या पार्श्वभूमीवर लष्कराच्या उत्तर विभागाचे कमांडर लेफ्टनंट जनरल रणबीरसिंग यांनी घेतला सुरक्षेचा आढावा
१०. ईव्हीएम विषयी माझ्या मनात कुठलीही शंका नाही, असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या उलट मत व्यक्त केलं आहे.
११. सुप्रिया सुळेंबद्दल फेसबुकवर अपशब्द, तरुणाला राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा चोप
१२. विधानपरिषदेच्या एका जागेसाठी ७ जूनला निवडणूक, शिवाजीराव देशमुख यांच्या निधनाने रिक्त जागा, 28 मेपर्यंत अर्ज भरण्याची तारीख
१३. सोलापूर – बार्शीमध्ये बाईकवर जाताना शिवीगाळ केल्याचा जाब विचारल्याने एकाची हत्या, बार्शीतील बाळेश्वर नाका भागातील प्रकार, २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू, एक गंभीर जखमी
१४. राज्यात भाजपची लोकसभानिहाय निवडणूक आढावा बैठक 21 मे रोजी होणार, मुंबईत वसंत स्मृती कार्यालयात बैठकीचं नियोजन
१५. सायन हॉस्पिटलमध्ये महिलेवर बलात्कार, एकाला अटक