मी जय श्रीरामचा नारा देत आहे , हिंमत असेल तर मला ममता बॅनर्जींनी अटक करून दाखवावी : अमित शहा

बंगालमध्ये कुणीही जय श्रीराम म्हणायचं नाही अशी सक्त ताकीद ममता बॅनर्जी यांनी दिली आहे. मी जय श्रीराम म्हणणारच हिंमत असेल ममतादीदींनी मला अटक करून दाखवावी असं आव्हानच अमित शाह यांनी दिलं आहे. अमित शाह यांच्या सभेला जावेदपूर या ठिकाणी परवानागी नाकारण्यात आली. त्यानंतर जॉय नगर भागात अमित शाह यांनी सभा घेतली. याच सभेत अमित शाह यांनी ममता बॅनर्जींवर निशाणा साधला आहे. बंगालमध्ये कुणीही जय श्रीराम असा नारा द्यायचा नाही असं ममतादीदींनी बजावलं आहे.
मात्र मी जय श्रीरामचा नारा देऊन इथून कोलकाता येथे जातो आहे. हिंमत असेल तर मला ममता बॅनर्जींनी अटक करून दाखवावी असं आव्हानच अमित शाह यांनी दिलं आहे. लोकसभा निवडणुकीचा सातवा आणि अखेरचा टप्पा बाकी आहे. अशात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्या सभांचा धडाका सुरू आहे. याच दरम्यान जॉय नगर मध्ये झालेल्या सभेत अमित शाह यांनी ममता बॅनर्जींवर निशाणा साधला आहे. माझ्यासोबत हात उंचवा आणि विजय संकल्प करा असं म्हणत त्यांनी जय श्रीराम हा नारा दिला.
अमित शाह यांच्यासोबत भाषणाला उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांनीही जय श्रीराम हा नारा दिला. गेल्या काही दिवसांपासून ममता बॅनर्जी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात शाब्दिक चकमक उडताना दिसते आहे. सातव्या आणि अखेरच्या टप्प्याचं मतदान बाकी आहे. अशात आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. आज भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी जय श्रीराम म्हणणारच हिंमत असल्यास अटक करून दाखवा म्हणत ममता बॅनर्जींना आव्हान दिलं आहे.