आठ वर्षाच्या बालिकेवर १४ वर्षीय मुलाकडून अत्याचार , आरोपीची बाल सुधार गृहात रवानगी

file pic
शिर्डीत आठ वर्षाच्या एका बालिकेवर चौदा वर्षाच्या मुलाने बलात्कार केल्याने खळबळ माजली आहे. पीडित बालिकेवर नगरच्या सिव्हील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. अत्याचार करणाऱ्या मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. त्याच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिर्डी शहराला लागून असलेला निमगाव परिसरात मोल मजुरी करणारे कुटुंब राहते. त्यांची आठ वर्षाची बालिका शौचालयास जात असताना शेजारी राहणाऱ्या चौदा वर्षाच्या मुलाने तिला गाठले व आडोशाला नेऊन तिच्यावर अत्याचार केला. ही घटना संध्याकाळी सहा वाजेच्या दरम्यान घडली. पीडीत मुलीवर नगरच्या सिव्हील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. अत्याचारी मुलाला पकडून त्याच्यावर शिर्डी पोलीस स्टेशनला बलात्काराचा आणि बाल अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला बालसुधार गृहात पाठवण्यात आले आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक अनिल कटके यांनी दिली.