‘आप’ कडून उभ्या राहिलेल्या ‘बापा’चाही राहिला न मुलगा !! बघा काय केले ?

राजकारण असो कि खासगी आयुष्य !! पैशाच्या नादापायी कोण कुणाशी कसे लागेल सांगता येत नाही. अशीच एक घटना दिल्लीत घडली असून या घटनेत चक्क मुलानेच आपल्या बापाने लोकसभेचे तिकीट विकत घेतल्याचे सांगितल्याने खळबळ उडाली आहे. बघा काय आहे बातमी ?
लोकसभा निवडणुकीसाठी दिल्लीतील सातही जागांवर उद्या मतदान होण्याच्या आधीच आम आदमी पार्टीविरोधातील एक धक्कादायक माहिती पुढे आली आहे. ‘आप’चे नेते अरविंद केजरीवाल यांनी माझ्या वडिलांना ६ कोटी रुपयांना निवडणुकीचं तिकीट विकल्याचा आरोप ‘आप’च्या उमेदवाराच्या मुलानेच केला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
आपचे पश्चिम दिल्लीतील उमेदवार बलबीर जाखड यांचे चिरंजीव उदय जाखड यांनी हा सनसनाटी आरोप केला आहे. मात्र बलबीर जाखड यांनी हा आरोप फेटाळून लावला आहे. केजरीवाल यांना सहा कोटी रुपये दिल्यानंतर उमेदवारी मिळाल्याचं माझ्या वडिलांनीच मला सांगितलं होतं. मी त्यांना पैसे देऊन तिकीट घेण्यास विरोध केला होता, असं उदय यांनी सांगितलं. उदय यांच्या म्हणण्यानुसार त्यांना उच्च शिक्षणासाठी पैसे हवे होते. मात्र त्यांच्या वडिलांनी पैसे देण्यास नकार दिला होता. त्यांनी उदय यांना पैसे देण्याऐवजी केजरीवाल यांना पैसे दिले होते.
माझे वडील सुरुवातीपासून आम आदमी पक्षात असल्याचा किंवा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या आंदोलनात सहभागी झाल्याचा एक तरी पुरावा दाखवा, असं आव्हानच उदय यांनी केजरीवाल यांना दिलं. माझ्या वडिलांनी केवळ तीन महिन्यांपूर्वीच राजकारणात भाग घेतला आहे. त्यापूर्वी ते कोणत्याच पक्ष किंवा संघटनेशी संबंधित नव्हते. वडिलांनीच मला केजरीवाल आणि गोपाळ राय यांना सहा कोटी रुपये देणार असल्याचं सांगितलं होतं, असं सांगतानाच याबाबतचे पुरावे आपल्याकडे असल्याचा दावाही त्यांनी केला आहे.