प्रियांका गांधी माणुसकी , ब्रेन ट्यूमरने आजारी मुलीला दिले स्वतःचे विमान !!

काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी शुक्रवारी प्रचाराची दंगल सुरू असतानाच एका आजारी मुलीच्या मदतीसाठी धावून गेल्या. त्यांनी त्या मुलीला स्वत:च विमान देत दिल्लीत एम्स रुग्णालयात दाखल करत माणूसकीचं दर्शन घडवलं. प्रचाराची रणधुमाळी सुरू असताना प्रियंकांनी केलेल्या या मदतीची चांगलीच चर्चा होत आहे.
प्रियंका गांधी या आज प्रयागराज इथं प्रचारासाठी आल्या होत्या. त्यावेळी त्यांना कार्यकर्त्यांकडून त्या आजारी मुलीची माहिती कळली. त्या मुलीचा शहरातल्या कमला नेहरु रुग्णालयात ब्रेन ट्यूमरवरच्या उपाचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. मात्र परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्याने ते कुटुंब मुलीच्या उपचाराचा खर्च करू शकत नव्हते. तसच अधिक चांगल्या उपचारासाठी त्या मुलीला मोठ्या शहरात हलविण्यात यावं असा सल्लाही डॉक्टरांनी दिला होता.
ही माहिती कळताच प्रियंका गांधी यांनी त्या मुलीला तातडीने दिल्लीत हलविण्याचा आदेश काँग्रेसच्या नेत्यांना दिला. काँग्रेसचे नेते राजीव शुक्ला, हार्दीक पटेल आणि मोहम्मद अझरुद्दीन हे यावेळी प्रियंका गांधी यांच्यासोबत होते. मुलीला तातडीने दिल्लीला दाखल करण्यासाठी प्रियकांनी आपलं सहा आसनी विमान त्या मुलीसाठी दिलं. हार्दीक पटेल आणि अझरुद्दीन त्या मुलीच्या कुटुंबीयांना घेऊन दिल्लीकडे रवाना झाले. प्रियंका गांधी त्या मुलीची एम्समध्ये जाऊन भेट घेणार आहेत आणि काँग्रेस त्या मुलीच्या उपचाराचा खर्चही उचलणार आहे.