अजोय मेहता यांची राज्याच्या मुख्य सचिवपदी नियुक्ती

मुंबई महानगरपालिका आयुक्त अजोय मेहता यांची राज्याच्या मुख्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. नियुक्तीचा अधिकृत आदेश शुक्रवारी संध्याकाळपर्यंत येण्याची शक्यता असून त्यानंतरच अजोय मेहता मुख्य सचिवपदाचा कार्यभार स्विकारतील. लोकसभा निवडणूक सुरु असल्याने सध्या आचारसंहित लागू आहे. यामुळे राज्य सरकारने अजोय मेहता यांच्या नियुक्तीचा प्रस्ताव निवडणूक आयोगाकडे पाठवला होता. निवडणूक आयोगाने हा प्रस्ताव स्विकारला आहे.
सध्या मुख्य सचिवपदी असणारे यु.पी.एस मदान यांनी स्वेच्छानिवृत्तीचा प्रस्ताव दिला आहे. यु.पी.एस मदान ऑक्टोबरमध्ये निवृत्त होणार होते. पण त्याआधीच त्यांनी स्वेच्छानिवृत्तीचा प्रस्ताव दिल्याने अजोय मेहता यांना संधी मिळाली आहे. अन्यथा अजोय मेहता यांना ही संधी मिळाली नसती. कारण अजोय मेहता सप्टेंबर महिन्यात निवृत्त होणार आहेत.