ताजी बातमी : पाकिस्तानात बाॅम्ब स्फोट , ९ ठार, अनेक जखमी

पाकिस्तानातील लाहोर आज शक्तिशाली स्फोटानं हादरलं. येथील प्रसिद्ध दाता दरबार सुफी दर्ग्याबाहेर स्फोट झाला. त्यात किमान नऊ जण ठार झाले. मृतांमध्ये पाच पोलिसांचा समावेश आहे. तर अनेक जण जखमी झाले.
सुफी दर्ग्यातील दाता दरबारबाहेर उभ्या असलेल्या पोलिसांच्या वाहनात स्फोट झाला. पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, दाता दरबारजवळील गेट क्रमांक २ समोरील पोलिसांच्या दोन वाहनांमध्ये स्फोट झाला. पाच पोलिसांसह सुरक्षा रक्षक आणि एक नागरिक यात ठार झाला. या स्फोटात २४ जण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यातील अनेकांची प्रकृती गंभीर आहे, अशी माहिती लाहोरमधील वरिष्ठ पोलीस अधिकारी अश्फाक अहमद खान यांनी जिओ न्यूजला दिली. हा आत्मघाती हल्ला होता की नाही हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही. घटनास्थळी बचावकार्य सुरू आहे.
Hey Deva
हे देवा