हॉटेलमध्ये ईव्हीएम सापडल्याने बिहारमधील मुझ्झफरपूर येथे उडाली खळबळ

बिहारमधील मुझ्झफरपूर येथील हॉटेलमधून एक ईव्हीएम सापडल्यामुळे नागरिकांमध्ये आणि विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत आहेत. यावरून विरोधकांनी जोरदार टीका केली आहे. प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी पोहोचून निवडणूक उपविभागीय अधिकारी कुंदन कुमार यांनी ईव्हीएम आपल्या ताब्यात घेतलं. ईव्हीएमबाबत झालेल्या हलगर्जीपणाबाबत आता काय कारवाई होणार ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. ईव्हीएमचे कस्टोडियन अवधेश कुमार यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.अवधेश कुमार यांना एक ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट जास्तीचं देण्यात आला होता. त्याला हॉटेलमध्ये ठेवण्यात आलं होतं. बुथ नंबर १०८ जवळ असलेल्या हॉटेल आनंदमध्ये हे ईव्हीएम ठेवण्यात आले होते.