News Updates : गल्ली ते दिल्ली : एक नजर : महत्वाच्या बातम्या …

३. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मुस्लिम बांधवांना दिल्या रमजानच्या शुभेच्छा
४. झारग्रामः मानवी तस्करीविरोधात आम्ही कायदा केला. बलात्कारसारख्या अपराधासाठी मृत्युंदाडाच्या शिक्षेची तरतूद केली आहे. मात्र, पश्चिम बंगालमध्ये हे कायदे लागू करण्यात आलेले नाहीत – पंतप्रधान मोदी
५. तामलूकः चक्रीवादळासंदर्भात आढावा बैठक घेण्यासाठी ममता बॅनर्जी यांच्याशी वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, ममता बॅनर्जी यांना राजकारणात अधिक रस आहे – पंतप्रधान मोदी
६. फनी वादळग्रस्तांची काळजी घेण्यासाठी राज्य सरकार सक्षम. केंद्र सरकारची मदत घेणार नाहीः ममता बॅनर्जी, मुख्यमंत्री पश्चिम बंगाल
७. पंतप्रधान मोदींचे पाकिस्तानशी छुपे संबंध आहेत , इम्रान खान यांना नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान व्हायला हवेत; यात काहीतरी काळबेरं आहे- अरविंद केजरीवाल
८. सीबीएसई बोर्डाचा दहावीचा निकाल जाहीर; ९१.१% विद्यार्थी उत्तीर्ण
९. हैदराबादः विमानतळार ३.३ किलोग्रॅम तस्करीचे सोने जप्त, एका व्यक्तीला ताब्यात घेतले. गुन्हा दाखल
१०. कोल्हापूरः शिवाजी पेठेतील कोंडेकर गल्ली येथे कुलदीप किरणराव कोंडेकर (वय ३५) या तरुणाची राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या
११. नवी दिल्लीः लैंगिक शोषणाच्या आरोपप्रकरणी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांना क्लीन चिट, सुप्रीम कोर्टाच्या तीन न्यायाधीशांच्या समितीने महिलेचे आरोप फेटाळले
१२. मुंबईः बलात्काराच्या आरोपावरून अभिनेता करण ओबेरॉयला अटक
१३. औरंगाबादः हाताला काम द्या, जनावरांना चारा द्या, डाव्या कालव्यात पाणी सोडा या मागणीसाठी शेतक-यांचे आंदोलन; विभागीय आयुक्तालयावर मोर्चा
१४. हैदराबाद – हैदराबादमध्ये जवळपास 50 सरकारी अॅम्ब्युलन्सला आग लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे. एकाच ठिकाणीय अॅम्ब्युलन्स पार्क करण्यात आल्या होत्या
१५. सोलापूर : बार्शी-आगळगाव मार्गावर सोमवारी दुपारी झालेल्या अपघातात दोन दुचाकीस्वारांचा जागीच मृत्यू झाला. भोईरे गावाजवळ ही दुर्घटना घडली.