आंतरजातीय विवाह केलेल्या मुलीला आणि जावयाला जाळले, मुलीचा मृत्यू

मुलीने आंतरजातीय विवाह केल्याने मुलीच्या काका आणि मामाने दोघांवरही पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केल्यांची घटना अहमदनगर जिल्ह्यात घडली आहे. यात गंभीरपणे भाजलेल्या मुलीचा मृ्त्यू झाला असून मुलावर पुण्यातील ससून हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील निघोज येथे ही घटना घडली आहे.
रुक्मिणी रणसिंग असे असून मुलाचे नाव मंगेश रणसिंग असे आहे. या दोघांचा सहा महिन्यांपूर्वी आंतरजातीय विवाह झाला होता. हा विवाह रुक्मिणीच्या कुटुंबीयांना मान्य नव्हता. रागावलेल्या रुक्मिणीच्या कुटुंबीयांनी रुक्मिणी आणि मंगेशच्या अंगावर पेट्रोल ओतून पेटवून दिले.
या प्रकरणी पारनेर पोलीस ठाण्यात गु्न्हा दाखल झाला असून मुलीचा काका आणि मामाला अटक करण्यात आली आहे. मुलीचे वडील मात्र फरार झाले आहेत.