लोकसभा निवडणूक २०१९ : पाचव्या टप्प्यासाठी सात राज्यांमध्ये ५१ मतदार संघात मतदानास सुरुवात

११ वाजेपर्यंत देशभरात २६.९६ टक्के मतदान
उत्तर प्रदेश: बसपा अध्यक्षा मायावती यांनीही बजावला मतदानाचा हक्क
भाजपला पूर्ण बहुमत मिळणार, राजनाथ सिंह यांनी व्यक्त केला आशावाद , केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी बजावला मतदानाच हक्क
मतदान प्रक्रियेत फेरफार करून निवडणूक जिंकण्याचा टीएमसीचा प्रयत्न; केंद्रीयमंत्री प्रकाश जावडेकर यांचा आरोप
सकाळी ११ वाजेपर्यंत बिहारमध्ये २०.७४ टक्के, जम्मू काश्मीरमध्ये ६.०९ टक्के, मध्य प्रदेश २८.६२ टक्के, राजस्थान २९.३६ टक्के, उत्तर प्रदेश २२.९६ टक्के, पश्चिम बंगाल ३३.५७ टक्के, झारखंडमध्ये २९.४९ टक्के मतदान
बिहारमध्ये सकाळी १० वाजेपर्यंत ११.५१ टक्के, जम्मू काश्मीरमध्ये १.३६ टक्के, मध्य प्रदेश १३.१८ टक्के, राजस्थान १४ टक्के, उत्तर प्रदेश ९.८५ टक्के, पश्चिम बंगाल १६.५६ टक्के, झारखंडमध्ये १३.४६ टक्के मतदान
जम्मू काश्मीरमधील अनंतनाग लोकसभा मतदारसंघात मतदानावर बहिष्कार घालण्याची दहशतवादी संघटनांची धमकी; भीतीच्या सावटाखाली मतदान प्रक्रियेला सुरुवात
बिहारमधील छपरा मतदान केंद्रावर ईव्हीएम तोडफोडप्रकरणी रंजीत पासवान नामक व्यक्तिला अटक
राजस्थानमध्ये सकाळी ९ वाजेपर्यंत १३.२४ टक्के, उत्तर प्रदेशमध्ये ९.८२ टक्के, झारखंड १३.४६ टक्के, बिहार ११.५१ टक्के, जम्मू काश्मीर ०.८० टक्के, मध्य प्रदेश ११.४३ टक्के, पश्चिम बंगाल १२.९७ टक्के मतदान
अमेठीतील गौरीगंज भागात एका महिलेला बळजबरी काँग्रेसला मतदान करण्यास सांगितले; स्मृति इराणी यांची निवडणूक आयोगाकडे तक्रार
लोकसभेच्या पाचव्या टप्प्यासाठी आज देशातील ५१ मतदारसंघांमध्ये मतदानाला सुरुवात झाली आहे. मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहारसह सात राज्यांमध्ये हे मतदान होत आहे. आज संयुक्त पुरोगामी आघाडीच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि काँग्रेसअध्यक्ष राहुल गांधी यांचं भवितव्य मतपेटीत बंद होणार आहे.