भाजपकडून अमेठीतील गावात पैसे पाठविण्यात येत असल्याचा आरोप : प्रियांका गांधी

‘भाजपवाले काँग्रेसच्या विरोधात केवळ चुकीचा प्रचारच करत नसून ते गावच्या प्रमुखांना पैशांची पाकिटंही पाठवत आहेत,’ असं प्रियांकांनी म्हटलं असून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासाठी अमेठी मतदारसंघात प्रचाराचा किल्ला लढविणाऱ्या काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी भाजपवर गंभीर आरोप केला आहे. . अमेठीतून भाजपच्या नेत्या व केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी राहुल गांधी यांना पुन्हा आव्हान दिलं आहे. गांधी घराण्याचा हा बालेकिल्ला जिंकायचाच या निश्चयानं भाजपनं इथं प्रचार सुरू केला आहे. गांधी कुटुंबासाठी प्रतिष्ठेच्या असलेल्या या मतदारसंघात प्रियांका गांधी काँग्रेसच्या प्रचाराची धुरा सांभाळत आहेत. भाजपच्या प्रचाराला सडेतोड प्रत्युत्त देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.
प्रियंकाने आरोप फेटाळले
अमेठीत आज झालेल्या सभेत प्रियांकांनी पुन्हा एकदा भाजपवर टीकास्त्र सोडले. ‘अमेठीत अत्यंत चुकीच्या पद्धतीनं प्रचार सुरू आहे. पैसे वाटप होत आहे. अमेठीतील गावकऱ्यांना मी काँग्रेसचा जाहीरनामा लिफाफ्यातून पाठवतेय. तर, भाजपवाले २० हजार रुपये पाठवताहेत. अमेठीतले सरपंच २० हजार रुपयांमध्ये विकले जातील असं भाजपवाल्यांना वाटतं हे हास्यास्पद आहे,’ अशा शब्दांत त्यांनी भाजपची खिल्ली उडवली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात घोषणा देण्यासाठी मुलांना प्रोत्साहन दिल्याच्या कथित प्रकरणात राष्ट्रीय बाल संरक्षण आयोगानं प्रियांकांना नोटीस बजावली आहे. अर्थात, प्रियांकांनी हे आरोप फेटाळले आहेत. मी मुलांना चुकीच्या घोषणा देण्यापासून थांबवत होते, असं त्यांनी म्हटलं आहे.