News Updates : गल्ली ते दिल्ली : एक नजर : महत्वाच्या बातम्या

1. ओडिशाः फनी चक्रीवादळ उद्या दुपारी १२ ते २च्या सुमारास ओडिशाच्या किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता; शाळा, कॉलेज बंद ठेवण्याचे सरकारकडून आवाहन
2. औरंगाबाद: अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर चार दिवस अत्याचार प्रकरणी आरोपी संतोष रामदास गायकवाडला अटक
3. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना निवडणूक आयोगाकडून नोटीस जारी, २४ तासांत उत्तर देण्याचे आदेश, संभालच्या सभेत त्यांनी विरोधांना उद्देशून ” बाबर कि औलाद ” असे विधान केले होते. त्याला आक्षेप घेत आयोगाने त्यांना हि नोटीस पाठवली आहे .
4. आपल्या मतदानातून मोदींना हे विचार कि , १५ लाख आणि वर्षाला दोन कोटी रोजगार देणार होते त्याचे काय झाले ? : सोनिया गांधी
5. औरंगाबाद: जर्मन शेफर्ड जातीच्या कुत्र्याची चोरी केल्याच्या प्रकरणात अकबर खान रऊफ खान याला अटक व शनिवारपर्यंत पोलिस कोठडी
6. गडचिरोलीः जवानांचं बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाहीः मुख्यमंत्री , गडचिरोलीत नक्षलवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना मुख्यमंत्र्यांनी वाहिली श्रद्धांजली
7. नवी दिल्लीः राष्ट्रीय आयोगाकडून प्रियांका गांधींना नोटीस जारी; प्रियांकाच्या सभेत लहान मुलांनी दिल्या होत्या घोषणा
8. मध्य प्रदेशमधील सभेत अमित शहांवर केलेल्या वक्तव्यावर राहुल गांधींना निवडणूक आयोगाकडून क्लीन चिट
9. औरंगाबाद: डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या सात वसतीगृहातील १६६ विद्यार्थिनी दूषित पाण्यामुळे आजारी, पाण्याचे नमुने तपासणीत प्रशासनाची दिरंगाई, विषबाधा पाण्यामुळे नसल्याचा कुलसचिव पांडे यांचा दावा, व्यवस्थापन परिषद सदस्य, विद्यार्थी संघटना आणि कुलसचिवात वाद
10. अंमलबजावणी संचालनालयाकडून झाकिर नाईकविरोधात चार्जशीट दाखल.
11. टेरर फंडिंग व मनी लाँडरिंग प्रकरणी ईडीकडून मोहम्मद सलमानची ७३.१२ लाख संपती जप्त
12. हमदनगर: सरकारने परवानगी दिल्यास नक्षलवाद्यांच्या प्रश्नी मध्यस्थी करण्यास तयार. – अण्णा हजारे, ज्येष्ठ समाजसेवक
13. माझं लक्ष २०१९ आणि २०२२ (यूपी विधानसभा निवडणूक) अशा दोन्ही वर्षांवर आहे. २०१९ साठी भाजपला हरवणं हे लक्ष्य आहे. २०२२ पर्यंत काँग्रेसला बळकट करायचंय. – प्रियांका गांधी, काँग्रेस महासचिव
14. मसूद अजहरला दुसरा झटका; पाकिस्तानात देखील बंदी
15. अहमदाबाद – इशरत जहाँ बनावट चकमक प्रकरण : डीजी वंजारा आणि एनके अमीन यांना मोठा दिलासा; न्यायालायने केले दोषमुक्त
16. राष्ट्रवादीकडून विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू; शरद पवारांनी 4 तारखेला बोलावली आमदार आणि जिल्हाध्यक्षांची बैठक