निवडणूक आयोगाकडून नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांना क्लीन चिट

निवडणूक आयोगाने आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना वेगवेगळ्या प्रकरणी क्लीन चिट दिली. मोदींना ‘न्यूक्लीअर बटन’च्या वक्तव्यावर तर राहुल गांधींना अमित शहांवरील आरोपांवर आयोगाने क्लीन चिट दिली. आयोगाने तिसऱ्यांना मोदींना क्लीन चिट दिली आहे. भारताने आपली अण्वस्त्र दिवाळीसाठी ठेवलेली नाहीत, असं वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थानच्या बाडमेरमधील प्रचारसभेत केलं होतं. या वक्तव्यावरून मोदींविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्यात आली होती.
या प्रकरणी आयोगाने मोदींच्या भाषणाचा तपशील मागवला होता. या भाषणाची तपासणी आयोगाने सविस्तर तपासणी केली. यात मोदींनी आचारसंहितेचं उल्लंघन केलं नसल्याचं आयोगाने स्पष्ट केलं.
भाजप अध्यक्ष अमित शहा हे हत्येतील आरोप आहेत, असा आरोप मध्य प्रदेशातील एका सभेत राहुल गांधींनी केला होता. यावरून राहुल गांधींविरोधात निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता उल्लंघनाची तक्रार करण्यात आली होती. यानंतर आयोगाने राहुल गांधी यांचे भाषण तपासले. राहुल गांधींना क्लीन चिट देत आयोगाने त्यांच्यावरील आरोप फेटाळून लावले.