मणीभूषणच्या मनाला आले आणि त्याने गाढवावर येऊन दाखल केली उमेदवारी पण गाढवही गेले अन उमेदवारीही गेली ….

बिहार मधील जेहानाबाद लोकसभा मतदार संघात एका अपक्ष उमेदवाराने चक्क गाढवावरून स्वारी करत आपला उमेदवारी अर्ज केल्याची घटना घडली. मात्र गाढवाच्या निमित्ताने चमकोगिरी करणाऱ्या या उमेदवाराच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे त्याचा अर्जही तांत्रिक कारणांमुळे बाद झाला.येत्या १९ मे रोजी या मतदार संघात मतदान होणार आहे.
या घटनेची अधिक , बिहार मधील जेहानाबाद लोकसभा मतदार संघाच्या उमेदवारी भरण्याच्या शेवटच्या दिवशी ( सोमवारी ) अपक्ष उमेदवार भूषण शर्मा हे चक्क गाढवावरून स्वारी करत उमेदवारी अर्ज भरण्यासाठी पोहचले. भूषण शर्मांना गाढवावर बसल्याचे पाहून लोकांनी गर्दी केली होती. काही लोकांनी त्यांची खिल्ली उडवण्याचा प्रयत्न सुद्धा केला. परंतु लोकांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून शर्मा यांनी गाढवावरून स्वारी करत जिल्हाधीकारी कार्यालय गाठले आणि आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
आपल्या या गाढव सवारीचे समर्थन करताना मणिभूषण म्हणाला कि , मी मुद्दामहून गाढवावरून स्वारी करून आहे. राजकीय नेते सर्वसामान्य मतदारांना गाढवाचं समजतात म्हणून मी हे प्रतीकात्मक कृत्य केले. मणी भूषण शर्मा यांना मात्र गाढवाची स्वारी महागत पडली आहे. गाढवावरून स्वारी केल्यामुळे अधिकारी नवीनकुमार यांच्या फिर्यादीवरून त्यांच्यावर प्राणी अत्याचारप्रतिबंध कायद्याप्रमाणे जहानाबाद येथील नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जहानाबाद लोकसभा मतदार संघात मात्र भूषण शर्मांची चांगलीच चर्चा रंगली आहे.