जो रखवाला आहे, तोच गडबड करतोय , समाजवादी पार्टीच्या नेत्या जया बच्चन अप्रत्यक्षपणे नरेंद्र मोदींवर टीका

जो रखवाला आहे, तोच गडबड करतोय, अशा शब्दांत समाजवादी पार्टीच्या नेत्या जया बच्चन यांनी लखनऊमधील प्रचारसभेत नाव न घेता अप्रत्यक्षपणे पंतप्रधान नरेंद्र मोदींवर तोफ डागली आहे. समाजवादी पक्षाकडून निवडणूक लढवणाऱ्या पूनम सिन्हा यांच्या प्रचारसभेला जया बच्चन आल्या होत्या. यावेळी त्यांनी नरेंद्र मोदींच्या भूमिकांवर टीका केली.
‘जो रखवाला आहे त्याची जबाबदारी खूपच महत्त्वाची आणि गरजेची असते. पण सध्याच्या सुरक्षारक्षकाची भूमिका काळजीत टाकणारी आहे,’ असं त्या म्हणाल्या. यावेळी बोलताना जया बच्चन यांनी पूनम सिन्हा यांना निवडून देण्यासाठी आवाहन केलं. समाजवादी पक्ष सर्वांना सामावून घेत आला आहे. तसेच सर्वांचे रक्षण करणे हाच आमचा ध्यास असल्याचं त्यांनी यावेळी म्हटलं.